Pune : फुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून वानवडी परिसरात ‘राडा’; टपरी चालकाचे घर पेट्रोल टाकून पेटवून दिले, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून बंद असलेल्या टपरीवर दगड मारत दोघांनी एकाला मारहाण करत त्याचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वानवडी परिसरात ही घटना रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. आरोपीने नंतर पुन्हा दोन गुन्हे केले आहेत.

याप्रकरणी नोमन आरिफ सय्यद व आत्तू झहुर अन्सारी (दोघेही रा. सय्यदनगर हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ रफिक सय्यद (वय 33) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांची पानटपरी आहे. हांडेवाडी रोडवर त्यांची टपरी आहे. रविवारी मध्यरात्री आरोपी हे पानटपरीवर आले. टपरी बंद असतानाही त्यावर दगड मारत त्यांनी सिगारेटची मागणी केली. फिर्यादीचे वडिलांनी लॉकडाऊन असल्याने पानटपरी बंद आहे व सिगारेटचे पाकीट नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने “साले बुढे हमको सिगारेट नही देता” असे बोलत त्यांना खाली पडून त्यांचा गळा दाबला. त्यामुळे ते बेशुद्ध देखील पडले होते. यावेळी फिर्यादी यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. फिर्यादी हे घराबाहेर थांबले होते. आरोपींनी पुन्हा त्यांच्या सोबत हुज्जत घातली. ‘ज्यादा हिरोगिरी मत कर मुझे अब रोज सिगारेट फ्री मे देना पडेगा नही तो काट डालुंगा’ असे बोलून कमरेला लावलेला कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादी हे जय हॉस्पिटलमध्ये गेले असताना या आरोपीनी त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून घर पेटवून दिले आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.