Pune Crime | पुण्याच्या सांगवीत भरदिवसा अंधाधुंद गोळीबार ! योगेश जगतापचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सांगवी (Sangavi) येथे दत्त जयंतीचा कार्यक्रम (datta jayanti) सुरु असताना दुचाकीवरुन आलेल्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबार करण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या गोळीबारात सराईत गुन्हेगार योगेश जगताप Yogesh Jagtap (रा. पिंपळे गुरव, सांगवी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औंध (Aundh) हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Firing in Pune) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं संपुर्ण पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात प्रचंड खळबळ (Pune Crime) उडाली आहे.

 

 

सांगवी येथील काटे पुरम चौकात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगवी येथील काटे पुरम चौकात दत्त जयंतीचा कार्यक्रम होता. योगेश जगताप हे मेड प्लस दुकानासमोर असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर 4 गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्याने योगेश तेथेच खाली कोसळला. त्यास तातडीने औंध हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळावर गोळीच्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अजून समजू शकले नाही.

 

दरम्यान, भरदिवसा कोट पुरम चौकात अंदाधुंद गोळीबार (Pune Crime) झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.
सांगवी पोलिस ठाण्यातील (Sangavi Police Station) वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यासह पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील (pimpri chinchwad police commissioner office )
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पिंपरीच्या गुन्हे शाखेचे (Pimpri Chinchwad Police Crime Branch) अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत.
परिसरातील CCTV आणि इतर दुव्यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

 

गोळीबारामध्ये मृत्यू झालेला योगेश जगताप हा सराईत गुन्हेगार (Criminal Yogesh Jagtap) होता.
त्याच्यावर यापुर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.
गुन्हयाचा पुढील तपास सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे (Senior Police Inspector Sunil Tonpe) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Indiscriminate firing all day long in Pune’s Sangavi ! Death of Criminal Yogesh Jagtap, huge uproar in Pimpri-Chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हडपसरमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’वर लैंगिक अत्याचार ! ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी देत 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या ‘राजेश माल्या’सह तिघांवर पुण्यात बलात्काराचा गुन्हा

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक विशेष संधी

 

Nitin Gadkari | जेव्हा गडकरींवर नाराज झाले होते बाळासाहेब आणि धीरूभाई अंबानी ! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले – ‘कसे रिलायन्सचे टेंडर रिजेक्ट करून वाचवले होते 2000 कोटी’

Pune Corona | ग्रामीण भागात ओमायक्रॉनच्या एन्ट्रीने चिंता वाढली, पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 73 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Thane-Diva corridor | 5 व्या आणि 6 व्या मार्गाच्या कामासाठी ठाणे- दिवा धिम्या कॉरिडॉरवर 18 तासांचा ‘मेगाब्लॉक’; जाणून घ्या रद्द झालेल्या एक्सप्रेस ट्रेनची यादी