Pune Crime | घटस्फोटाच्या केससाठी अकाऊटंटला हाताशी धरुन सासर्‍याने मिळविली जावयाच्या उत्पन्नाची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती पत्नींमध्ये पटत नसल्याने त्यांनी घटस्फोटाचा (Divorce) न्यायालयात दावा दाखल केला. पत्नीने पोटगीसाठी (Alimony) न्यायालयात अर्ज केला आहे. पती आपले उत्पन्न कमी दाखवत असल्याचा तिला संशय होता. त्यातून त्याच्या अकाऊटंटला हाताशी धरुन सासर्‍याने जावयाच्या उत्पन्नाची सर्व माहिती मिळवली. हे समजल्यावर त्याने आपल्या अकाऊटंट, सासर्‍यासह तिघांविरुद्ध पोलिसांकडे (Pune Crime) धाव घेतली.

 

याप्रकरणी एका 40 वर्षाच्या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी (Pune Police) खुशाल रतनशी धरोड (Khushal Ratanshi Dharod), महेश जाधव (Mahesh Jadhav) आणि फिर्यादीचा अकाऊटंट मनिकांत खोना (Manikant Khona) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना शुक्रवार पेठेत 8 जून 2019 ते 2 सप्टेंबर 2021 दरम्यान घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशाल धरोड आणि महेश जाधव यांनी फिर्यादीचा अकाऊटंट मनिकांत खोना याच्याशी संगनमत केले.
फिर्यादी यांनी विश्वासाने खोना याच्या कडे आयकर (Income Tax) संबंधित तसेच इतर महत्वाची गोपनीय दस्तऐवज आणि इतर महत्वाचा डाटा दिला होता.
खोना याने दोघांशी संगनमत करुन ही सर्व गोपनीय माहिती फिर्यादीच्या संमतीशिवाय परस्पर त्यांच्या ई मेल आयडीवर पाठविला.
त्यांनी या गोपनीय माहितीचा दुरुपयोग घटस्फोटाच्या खटल्यात करण्यासाठी फिर्यादी यांच्या पत्नीला पाठविला.
त्यात त्यांच्या पत्नीचा सहभाग असू शकतो, असा संशय फिर्यादीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक तटकरे (Police Inspector Tatkare) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime Information of income to be obtained by the father in law by holding the account in hand for divorce case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा