Pune Crime | सासुनं पैसे लुबाडले त्यानंतर पत्नीने भलतच केलं, सासरच्या छळाला कंटाळून जावायनं संपवलं जीवन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहराला लागून असलेल्या आणि औद्योगिक नगरी (Industrial City) म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये एका तरुणाने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. सासू, बायको, मेहुणा, मेहुणी आणि साडू यांच्या त्रासाला वैतागून तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) त्याने त्याच्या मृत्यूचं खरं कारण लिहिलं आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींची नावे लिहून तरुणाने आपलं जीवन संपवलं. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

गणेश नागनाथ चव्हाण (Ganesh Nagnath Chavan) असे आत्महत्या (Pune Crime) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गणेशचे वडील नागनाथ भाऊराव चव्हाण Nagnath Bhaurao Chavan (वय-50 रा. मु.पो. निचपुर, ता. किनवट जि. नांदेड-Nanded) यांनी बुधवारी (दि.23) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृताची पत्नी रोशनी गणेश चव्हाण Roshni Ganesh Chavan (वय-24), वनिता मोहन पवार Vanita Mohan Pawar (वय-45 रा. नांदेड), रुपाली आलोक राठोड Rupali Alok Rathod (वय-20 रा. मुंबई-Mumbai), आलोक दशरथ राठोड Alok Dasharath Rathod (वय-28 रा. मुंबई), रितेश मोहन पवार Ritesh Mohan Pawar (वय-19 रा. नांदेड) यांच्यावर भा.द.वी कलम 306,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे. (Pune Crime)

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत गणेश आणि आरोपी पत्नी रोशनी यांचा विवाह 2013 मध्ये झाला होता. गणेश हा पुण्यातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक (Security Guard) म्हणून काम करत होता. तो आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह सुतारवस्ती, माण आणि हिंजवडी परिसरात वास्तव्याला होता. दरम्यान, सासू वनिता पवार हिने गणेशकडून 1 लाख 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र पैसे परत करण्यास ती टाळाटाळ करत होती. गणेशने वारंवार पैसे मागितल्यानंतरही तिने पैसे दिले नाहीत. पैशांच्या कारणावरुन वाद झाल्यानंतर आरोपी सासूने आपली मुलगी रोशनीला गणेश विरोधात भडकावलं. यामुळे रोशनी आणि गणेश यांच्या वाद झाले.

 

 

या वादानंतर पत्नी रोशनी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मुंबईला बहिणीकडे निघून गेली.
यानंतर तिने आपल्या मुलांना गणेशपासून लपवून ठेवले.
तसेच गणेशला मुलांना भेटू न देता मानसिक त्रास (Mental Distress) देण्यास सुरुवात केली.
यामध्ये रोशनीला तिची बहिण रुपाली आणि तिचा नवरा अलोक यांनी मदत केली.
अखेर आरोपींच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला वैतागून गणेश याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

गणेशने आत्महत्या करण्यापूर्वी भाऊ दिनेशला फोन केला. मी खूप त्रासलो आहे.
मला त्रास सहन होत नाही. तुझ्याशी माझं शेवटचं बोलणं आहे, असे त्याने म्हटले.
भावाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समजताच दिनेशने त्याच्या एका मित्राला घरी पाठवले.
गणेशचा मित्र घरी पोहचेपर्यंत खूप उशीर झाला होता. गणेशने गळफास घेतला होता.
गणेशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली.
यामध्ये त्याने पत्नी, सासू, मेहुणा, मेहुणी आणि साडूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | inhuman persecution by in law family son in law commit suicide in pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा