Pune Crime | सुरुवातीला शेअर मार्केटमधून मिळवून दिला नफा, मात्र नंतर घातला लाखोंचा गंडा; कोंढव्यात FIR
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे गुंतवल्यास (Investment) चांगला फायदा (Profit) करुन देण्याचे आमिष (Lure) दाखवून सुरवातीला फायदा करुन दिला. मात्र, त्यानंतर लाखो रुपयांचा गंडा (Cheating Fraud) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) विनीत चौधरी Vineet Chaudhary (रा. कोलकाता – Kolkata) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी (Pune Police) IPC 406 आणि 420 नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
याबाबत बराजु सुरेश गोडसे Baraju Suresh Godse (रा. टिळक नगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा प्रकार 22 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाइन घडला आहे. गोडसे यांनी शनिवारी (दि.9) कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
—
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना ऑनलाईन संपर्क (Online Contact) साधून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली.
आरोपीने सुरुवातील फिर्यादी यांना चांगला नफा मिळवून देत त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादी यांचे झिरोदा ट्रेडिंग अकाउंट चे (Zerodha Trading Account) युजर आयडी (User ID) व पासवर्ड (Password) घेतले.
त्यावेळी त्याने परवानगी शिवाय अकाउंट वापरणार नसल्याचे आश्वासन दिले.
मात्र आरोपी विनीत चौधरी याने फिर्यादी यांचे ट्रेडिंग अकाउंट वापरून 1 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Initially he made a profit from the stock market but later he fraud cheating millions FIR in Kondhwa
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update