Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, मित्राला मारल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राला का मारले यावरुन दोघांनी एकाला हाताने व दगडाने मारहाण (Beating) करण्याचा प्रकार येरवडा कारागृहात (Yerwada Jail) घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी पपड्या ऊर्फ अजय शामराव सोनवणे Papadya alias Ajay Shamrao Sonawane (वय 24, रा. गेरवाई, जि. बीड-Beed, सध्या येरवडा कारागृह) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुकुल रेवणसिद्ध कांबळे (Mukul Revansiddha Kamble) आणि सुशांत सुरेश शिंदे Sushant Suresh Shinde (दोघे रा. दत्तनगर, चिंचवड -Chinchwad, सध्या येरवडा कारागृह) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 29 जून रोजी सकाळी साडेसात वाजता कारागृहातील पाण्याच्या हौदाजवळ घडला. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे सध्या येरवडा कारागृहात आहेत. फिर्यादी सोनवणे हा सकाळी आंघोळीसाठी गेला असताना मुकुल व सुशांत यांनी तू आमचा नंबरकारी मित्राला का मारले, असे म्हणून दोघांनी हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. मुकुल याने खाली पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारला. सुशांत याने फरशीचा तुकडा डोक्यात मारुन जखमी केले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार देसाई (Police Constable Desai) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Inmates clash in Yerwada jail, stone pelted for killing friend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे…’

 

Pune Crime | भर रस्त्यात महिलेने स्वत:चा टॉप फाडून केली महिला पोलिसांना मारहाण; वडगावशेरी परिसरातील घटना

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम