Pune Crime | इंस्टाग्रामवर ‘त्या’ महिलेशी झालेली ओळख तरुणाला महागात पडली, महिलेनं ठेवले जबरदस्तीने ‘संबंध’; पण…

पुणे : Pune Crime | इंस्टाग्रामवरुन (Instagram) झालेल्या ओळखीतून एका महिलेने तरुणाला भेटायला बोलावले. त्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर आपल्या सहकार्‍यांमार्फत त्याचे अपहरण करुन त्याला लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी न्यू पनवेल येथील एका ३१ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह तिच्या 3 साथीदारांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण व महिलेची इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर या महिलेने कोंढाव्यातील येवलेवाडी येथे या तरुणाला भेटायला बोलावले. त्यानुसार हा तरुण मोठ्या उत्साहाने 7 ऑगस्ट रोजी तिला भेटायला पुण्यात आला. तेथे या महिलेने त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी हा तेथून आपल्या कारमधून निघाला असताना वाटेत तिघांनी त्याला अडवून ते जबरदस्तीने कारमध्ये बसले. फिर्यादीला त्यांनी मारहाण केली. तसेच एका इंस्टाग्राम आयडीवरील महिलेसोबत बलात्कार केला आहे. त्याची पोलिसांत खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. पैसे दिले नाही तर या महिलेसोबत लग्न करावे लागेल, असे कागदावर लिहून  घेतले. त्यावर फिर्यादीची सही व अंगठा घेतला. त्यानंतर फिर्यादी याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील 50 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील एटीएम कार्डमधून जबरदस्तीने 30 हजार रुपये काढून घेतले. या घटनेने फिर्यादी तरुण घाबरुन जाऊन आपल्या घरी गेला होता. आरोपींकडून उर्वरित पैश्यांची मागणी होऊ लागल्याने त्याने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

हे देखील वाचा

FYJC Admission 2021 | अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर ! प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु, जाणून घ्या कशी असेल प्रवेश प्रक्रिया

Modi Government | 65 लाख पेन्शनधारकांना मिळाला मोठा दिलासा ! 45 दिवसात प्रकरणे निकाली काढणार, कार्यालयांच्या माराव्या लागणार नाहीत फेर्‍या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | instagram account youth in trouble while woman demands 5 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update