Pune Crime | धुम स्टाईलने चैन स्नॅचिंग करणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, लाखोचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये धूम स्टाईलने (Dhoom Style) चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला (Interstate Criminal Gang) गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या (Crime Branch Unit 5) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सहा गुन्हे (Pune Crime) उघडकीस आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी संजय रामब्रिज सहाणी (Sanjay Ram Brij Sahani), दिपककुमार अभय सिंग (Deepak Kumar Abhay Singh) यांना अटक केली असून आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

 

पुणे शहरामध्ये (Pune Crime ) चैन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग (Bag Lifting) आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये (Vehicle Theft) वाढ होत आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे वाढत असल्याने गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. सोमवारी (दि.18) पथकातील पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, होळकरवाडी (Holkarwadi) येथे राहणाऱ्या दोघांनी पल्सर गाडी चोरली असून गाडीची पुढील नंबर प्लेट काढून मंतरवाडी (Mantarwadi) भागात फिरत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मंतरवाडी भागात सापळा रचून संजय रामब्रिज सहाणी (वय – 21 रा. मु. पो. गोहारपुर, ठाणा पुरंदरपुर, ता. नौतनवा, जि. महाराजगंज उत्तर प्रदेश – Uttar Pradesh) आणि दिपककुमार अभय सिंग (वय – 21 रा. मु. पो. मोदागोल वस्ती, सितामढी, बिहार – Bihar सध्या रा. होळकरवाडी, ता. हवेली) यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी हडपसर भागात दोन चैन स्नॅचिंग, एक बॅग लिफ्टिंग व तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे करण्याची पद्धत
अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतर राज्यात (Other States) विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे प्रत्येक वर्षी नवीन राज्यात जाऊन पहिल्यांदा त्या ठिकाणी मिळेल ते काम करत होते. काम करत असताना त्या भागाची पाहणी करत होते. त्यानंतर आरोपी गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare), पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, विनोद शिवले, चेतन चव्हाण यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Inter state gang involved in chain snatching Arrested Pune Police Crime Branch


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा