Pune Crime | मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बंडगार्डन पोलिसांकडून पर्दाफाश, 15 लाखांचे 70 मोबाईल जप्त (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात मोबाईलवर बोलत असलेल्या नागरिकांचे जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Theft) आंतरराज्य टोळीचा (Interstate Gang) बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) पर्दाफाश (Pune Crime) केला आहे. या टोळीकडून तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 70 अँड्रॉइड फोन (Android Phone) जप्त केले आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी 5 जणांना अटक (Arrest) केली आहे.

 

विकास वाघेरे (वय-22 रा. अशोकनगर, येरवडा Yerawada), अनिकेत लक्ष्मण कांबळे (वय-20 रा. येरवडा), एलिसन विल्सन पिल्ले (वय-19 रा. शास्त्रीनगर, घोरपडी गाव, पुणे), तेजस गुलाब बाटे (वय-27 रा. किरकिटवाडी, सिंहगड रोड Sinhagad Road, पुणे), निखील रामा पुजारी (वय-28 रा. डोबरवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रशांत मधुकर नेवे (रा. रिंग रोड, भुसावळ Bhusawal) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) 4 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. (Pune Crime)

 

दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मुलगा गौरव नेवे हे 4 फेब्रुवारी रोजी भुसावळ येथून पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) येथे आले होते. सकाळी सातच्या सुमारास गौरव हा रेल्वे स्टेशन येथून हडपसर (Hadapsar) येथील नातेवाईकांडे जाण्यासाठी ओला बुक करत असताना दुचाकीवरुन दोघे जण आले. मागे बसलेल्या व्यक्तीने गौरवच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल चोरून नेला. याप्रकरणाचा सखोल तपास करुन पोलिसांनी विकास वाघेरे आणि अनिकेत कांबळे यांना अटक करुन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांचे साथिदार एलिसन, तेजस आणि निखील यांची नावे निष्पन्न झाली. त्यांना गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडून चोरीचे 20 मोबाईल जप्त केले.

पोलिसांनी आरोपींकडे गुन्ह्याची पद्धत व चोरी केलेल्या मोबाईल बाबत चौकशी केली. आरोपींनी पुणे शहरातील (Pune City) विविध भागातून मोबाईल चोरल्याचे सांगितले. तसेच चोरलेले मोबाईल डोबरवाडी येथील निखिल पुजारी याच्याकडे दिल्यानंतर तो त्याचा साथिदार शिवा पुजारी याला विकत होता. शिवा पुजारी हा चोरीचे मोबाईल फोन हे गुजरात (Gujarat) येथील कासिम नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या ठिकाणी कुरियर द्वारे मुंबई (Mumbai), अहमदाबाद (Ahmedabad) व त्यानंतर कोलकाता (Kolkata) येथील हस्तकाकडे पाठवत असल्याची माहिती मिळाली.

 

पोलिसांनी शिवा पुजारी याला 10 फेब्रुवारी रोजी हडपसर येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता. त्याने काही वेळापूर्वीच कुरिअरने 50 मोबाईल फोन मुंबईला पाठवल्याचे सांगितले. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करुन चोरीचे 50 मोबाईल फोन जप्त केले. बंडगार्डन पोलिसांनी या कारवाईत एकूण 15 लाख रुपयांचे 70 मोबाईल जप्त करुन 5 जणांना अटक केली आहे. तर 17 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी (ACP Yashwant Gawari),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar),
पोलीस अंमलदार मोहन काळे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, सचिन भिंगारदिवे,
अमोल सरडे, संजय वणवे, सागर घोरपडे, किरण तळेकर, अंकुश खानसोळे यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Inter-state gang of mobile phone thieves busted by Pune Bundgarden police, 70 mobiles worth Rs 15 lakh seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने केले ‘कंगाल’, सातत्याने लागत आहे लोअर सर्किट

 

Post Office Transaction Rules | पोस्ट ऑफिसमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रांजक्शनसाठी द्यावी लागतील ‘ही’ कागदपत्रं, जाणून घ्या सविस्तर

 

Eggs Health Benefits | चाळीशीनंतर अंडे खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर