Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरोड्याच्या तयारीत (Robbery) असलेल्या आंतरराज्य टोळीला (Interstate Gang) गुन्हे शाखा युनिट चारच्या (Pune Police Crime Branch) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे तर दोनजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई सोमवारी (दि.11) खडकी अॅम्युनिशन फॅक्टरी कडून (Khadki Ammunition Factory) विश्रांतवाडी कडे जाणाऱ्या टँक रोडवर (Pune Crime) केली.
अक्षय विक्रम आरडे Akshay Vikram Arde (वय – 19 रा. आळंदी रोड, भोसरी मुळ रा. घाटावडे, जि. बीड), अंत्रोस गोंदेलाल पवार Antros Gondelal Pawar (वय – 40 रा. बेडाऊ, ता. छन्नेरा, जि. खंडवा, मध्य प्रदेश, सध्या रा. पुणे फिरस्ता), आकीलाल साकीलाल पारधी Akilal Sakilal Pardhi (वय – 25 रा. ग्राम कुडो, ता. रिठी, जि. कटनी, मध्यप्रदेश), बियरलाल मनीबेज राजपुत Beerlal Manibej Rajput (वय – 25 रा. ग्राम कोहडे, ता. रिठी, जि. कटनी, मध्यप्रदेश Madhya Pradesh) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अतुल चव्हाण व सुरज हे फरार झाले आहेत. आरोपींवर खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) आयपीसी 399, 402, भारताचा हत्यार कायदा (Arms Act), महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
—
गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अधिकारी कर्मचारी खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अॅम्युनिशन फॅक्ट्रीकडून विश्रांतवाडी कडे जाणाऱ्या टँक रोडवर एक रिक्षा संशयित रित्या उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी रिक्षा आणि त्यामधील व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली. रिक्षाची झडती घेतली असता हत्यारे, कटावनी, कटर, नायलॉन दोरी ही घरफोडीची सामान आढळून आले. आरोपी हे मुळचे मध्यप्रदेशातील कटनी येथील आहेत. त्यांनी पुणे शहर आणि परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar), पोलीस सहायक निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav), पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (Jaideep Patil), पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, प्रविण भालचीम, प्रवीण कराळे, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, विनोद महाजन, कौस्तुभ जाधव, सारस साळवी, रमेश राठोड, अशोक शेलार, वैशाली माकडी, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime | Inter state gang preparing for the robbery was arrested by pune police crime branch
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update