Pune Crime | महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी पुणे पोलिसांकडून गजाआड (CCTV Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे (Pune Crime) आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसाकावून (Mobile snatching) नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune Crime) विमानतळ पोलीस ठाण्यातील (vimantal police station) तपास पथक व सर्व्हेलन्स पथकाकडून पेट्रोलिंग करण्यात येत आहे. पेट्रोलिंग दरम्यान पथकाने महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय चार जणांच्या टोळीला (Interstate gang) अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Mobile Thieves Arrested by Pune police)

मनोज काशिनाथ कासले (वय-20), शिलारसाहेब मोहम्मद ईस्माईल सौदागर (वय-20), बालाजी धनराज कासले (वय-22), शेरली चांदसाहेब शेख (वय-22 सर्व रा. भालकी राज्य कर्नाटक सध्या रा. कस्तुरबा वसाहत औंध, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना विमानतळ पोलिसांनी विमाननगर (Vimannagar) येथील दत्त मंदिर चौकात केली.

विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील (investigation team) अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव (PSI Sachin Jadhav) यांना विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात चार जण दुचाकीवरून मोबाईल स्नॅचिंग करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील पोलिसांनी सापळा रचून दोन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल जप्त केले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी कर्नाटकातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींकडून विमानतळ पोलीस ठाण्यातील 5, चिखली (Chikhali police station) आणि येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerawada Police Station) प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित मोबाईल पैकी 2 मोबाईल चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandannagar Police Station) हद्दीतून चोरल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan),
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (DCP Pankaj Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav)
यांच्या आदेशावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Police Inspector Bharat Jadhav),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Mangesh Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, अविनाश शेवाळे, गणेश साळुंखे, उमेश धेंडे, अशोक आटोळे, रमेश लोहकरे, सचिन जाधव, विनोद महाजन, हरुण पठाण, विनोद भोसले, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, रुपेश पिसाळ, गिरीष नाणेकर, शिवराज चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Titel :- Pune Crime | Inter-state gang snatching women’s mobile phones nabbed by Pune police (CCTV Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कमाईची गोष्ट ! SBI चा धमाका, आता तुम्हीसुद्धा घरबसल्या कमवा 60 हजार रुपये महिना, जाणून घ्या अटी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 157 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Barti Pune | बार्टीला नियमित निधी न दिल्यास भाजप तर्फे आंदोलनाचा इशारा; भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन