Pune Crime | दर महा 40 % ! सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिक बेपत्ता; तगादा लावणार्‍या सावकाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेळ्या बकर्‍यांच्या व्यवसायासाठी २ लाख रुपये घेऊन त्याचे १२ लाख २४ हजार ९०० रुपये परत केले. तरीही हात उसने बिनव्याजी पैसे दिले आहेत, असे नोटराईज अ‍ॅग्रीमेंट करुन घेऊन आणखी व्याजाचे पैश्यांची मागणी केल्याने व्यावसायिक घरातून निघून गेला. लोणी काळभोर पोलिसांनी (Lonikalbhor Police Station) या सावकाराला (Money Lender In Pune) अटक केली असून दुसर्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

शरीफ बाशू जमादार (वय ५३, रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अरशान रफिक मणियार (वय ३३, रा. हत्ती महल), अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याबाबत मिठानगर कोंढवा (Mithanagar Kondhwa) येथे राहणार्‍या एका ३८ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २५७/२२) दिली आहे. फिर्यादी यांच्या पतीने फेब्रुवारी २१ मध्ये शरीफ जमादार याच्याकडून दर महा ४० टक्के दराने शेळ्या, बकर्‍याचे व्यवसायासाठी २ लाख रुपये घेतले होते. एका वर्षभरात त्याचे त्यांनी १२ लाख २४ हजार ९०० रुपये दिले आहेत. तसेच अरशान मणियार यांच्याकडून १ लाख रुपये घेतले होते. त्याचे आतापर्यंत ४ लाख ४१ हजार ५० रुपये दिले आहेत. असे असताना फिर्यादी यांचे पतीस पैसे हात उसने बिनव्याजी दिले आहेत, असे नोटराईज अ‍ॅग्रीमेंट करुन घेतले व तारण म्हणून फिर्यादीचे राहते घर जबरदस्तीने नोटराईज अ‍ॅग्रीमेंट करुन लिहून घेतले. तसेच त्यांच्याकडे आणखी व्याजाचे पैश्यांची मागणी करत होते. त्यांचे त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचे पती कोठे तरी निघून गेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांना शिवीगाळ करुन घर खाली करण्यास सांगितले, म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Interest of 40% per month Business disappears due to moneylenders harassment Lender arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा