Pune Crime | पुण्यात देहूरोड पसिरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; विदेशी तरुणीसह 10 जणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात (Pune Crime) सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा (International prostitution racket) पोलिसांनी पर्दाफाश (exposed) केला आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehu Road Police Station) हद्दीत ही कारवाई केली असून हद्दीतील एका लॉजवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 10 महिलांची सुटका (10 Woman Released) केली आहे. यामध्ये काही विदेशी आणि परराज्यातील तरुणींचा समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत 25 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त (Pune Crime) केला असून लॉज मालकासह मॅनेजर विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथक आणि अवैध मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU, Pimpri Chinchwad Police)पथकाकडून करण्यात आली.

 

लॉजचा मॅनेजर गवी रंगा कृष्णा गोवडा (वय-38 रा. किवळे, मूळ रा. भोईसर, मुंबई) आणि लॉजचा मालक प्रताप शेट्टी (वय-40 सध्या रा. कात्रज, मूळ रा. उडपी, कर्नाटक) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेट्टी हा आपल्या लॉजमध्ये काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय (Prostitution) करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा पथक आणि अवैध मानवी तस्करी
प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून मुंबई-बेंगळुरु महामार्गालगत (Mumbai-Bangalore Highway)
असणाऱ्या किवळे येथील द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी छापेमारी केली आहे.
सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Pune Crime) केला आहे.

 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 10 तरुणींची सुटका केली आहे.
यामध्ये एका परदेशी तरुणीसह 6 परराज्यातील आणि 3 महाराष्ट्रातील तरुणींचा समावेश आहे.
तसेच पोलिसांनी आरोपींकडून 11 हजार 400 रुपयांची रोकड, 14 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल
आणि 300 रुपये किंमतीचे इतर साहित्य असा एकूण 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | international prostitution racket exposed in dehu raod area of pune 10 woman released fir lodged on owner of lodge and manager

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Modi Government | अखेर कुठे गेल्या 2000 च्या नोटा? मोदी सरकारने सांगितले मार्केटमधून नोटा कमी होण्याचे कारण

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, अग्नीशस्त्र जप्त

Pune Crime | महिलेवर चाकूने वार करुन जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात