Pune Crime | डेटींग अ‍ॅपवर झाली ओळख, लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | डेटिंग अ‍ॅपवर (Dating App) ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस (Pune Crime) आली आहेत. तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Talegaon Dabhade Police) आरोपी इंद्रनील आलोक बोस Indranil Alok Bose (वय-29 रा. सासवड रोड, उंड्री-Undri) याच्यावर IPC 376, 376(2)(एन), 506,420 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

याबाबत 28 वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9 जानेवारी 2022 रोजी पुण्यातील (Pune Crime) रावेत येथे घडला असून पीडित तरुणीने रविवारी (दि.18) फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे (API Uddhav Khade) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांची डेटिंग अॅपवर ओळख झाली. आरोपीने तरुणीसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. तसेच शरीर संबंधाची माहिती घरच्यांना देण्याची धमकी (Threat) देऊन तो रहात असलेल्या घरी बोलावून घेतले. आरोपीने 1 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत पीडित तरुणीसोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. (Pune Crime)

पीडीत तरुणी आणि आरोपी यांचे कोर्ट मॅरेज (Court Marriage) करण्याचे ठरले होते. तरुणीच्या बहिणीने आरोपीच्या मनाप्रमाणे वस्तू खरेदी करुन दिल्या होत्या. आरोपीने त्या वस्तू स्वत:कडे ठेवून फिर्यादी तरुणीची फसवणूक (Cheating) केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी इंद्रनिल बोस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Introduced on a dating app, raped by showing the lure of marriage


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कर्वेनगर परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Reliance Jio – Airtel Prepaid Recharge Plans | एअरटेल, जिओचे 300 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन्स; फ्री कॉलिंगसह SMS सुविधाही उपलब्ध; जाणून घ्या

Bank Timing Change | RBI चा मोठा निर्णय ! आजपासून बँक उघडण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या

Pune School Bus Fares Increase | पुणेकरांना महागाईचा झटका ! स्कूल बसच्या भाड्यात प्रचंड वाढ