Pune Crime | भांडणे सोडविण्यासाठी जाणे तरुणाला पडले महागात; तरुणाच्या खूनाचा प्रयत्न, खडकी पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दसर्‍याची मिरवणुक पहात असताना सुरु असलेला वादात समजावून सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. दोघांची भांडणे राहिली दूर या तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) करण्यात आला. (Pune Crime)

 

याप्रकरणी बॉबी सोनू सिंग Bobby Sonu Singh (वय २५, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनिष राजू पडीयार ऊर्फ गब्या (Manish Raju Padiyar alias Gabya) (वय २०, रा. बोपोडी), सुनिल शेट्टी ऊर्फ लाली (Sunil Shetty alias Lali), गणेश शेट्टी ऊर्फ घुल्या Ganesh Shetty alias Ghulya (रा. सर्व बोपोडी) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मनिष पडीयार याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार बोपोडीतील जय मातृभूमी मित्रमंडळासमोर ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला.

फिर्यादी हे दसर्‍याची मिरवणुक बघत उभे होते. त्यांचा मित्र अभिजित मोरे Abhijit More (वय २६) व मनिष पडीयार व इतरांमध्ये वाद चालू होता.
अभिजित मोरे याने फिर्यादीला बोलावले. तेव्हा फिर्यादी हे मनिष पडीयार याला समाजावून सांगत होते.
त्याचा राग येऊन मनिष याने शर्टखाली लपविलेला कोयता काढून “तुला लाय माज आला आहे,
तुझा गेमच करतो,” असे म्हणाला. सुनिल व गणेश शेट्टी यांनी
त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन “तुला आज सोडत नाही तुझा जीवच घेतो,”
असे म्हणून कोयतयाने डोक्यावर वार केला. तेव्हा फिर्यादी यांनी दोन्ही हात वर करुन तो वार अडविला.
दोन्ही हात, दंडावर वार करुन जखमी केले. हवेत कोयता फिरवून मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन दहशत निर्माण करुन निघून गेले.
फिर्यादी हे उपचार करुन आल्यावर शनिवारी त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक कांबळे (Sub-Inspector of Police Kamble) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | It cost the young man dearly to go to settle the quarrel; Attempted murder of youth, FIR in Khadki police station crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP | राष्ट्रवादीने भाजपाला दिला सूचक इशारा, खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो

Shivsena | उद्धव ठाकरे यांच्यासमोर ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय, निवडणूक आयोगाकडे दावा करणार

NCP Chief Sharad Pawar | मागील काही दिवस वाचत होतो, ते घडलं, पण…, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया