Pune Crime | मैत्रिणीला सोडविण्यासाठी लोहगाव एअरपोर्टमध्ये प्रवेश करणे दोघांना पडले महागात; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जयपूरला जाणार्‍या (Pune To Jaipur Flight) मैत्रिणीला सोडविण्यासाठी बनावट तिकीट (Fake Flight Ticket) तयार करुन लोहगाव एअरपोर्टच्या (Lohegaon Airport) अंतर्गत भागात प्रवेश करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. विमानतळावरील सुरक्षा विभागाने (Airport Security Department) त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. (Pune Crime)

याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या Central Industrial Security Force (CISF) गुलझारी मिना यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (१६९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौतम अरविंद शिंदे Gautam Arvind Shinde (वय २१, रा. सॅलसबरी पार्क, गुलटेकडी) आणि महंमद अमान देसाई Mohammad Aman Desai (वय २१, रा. पारगेनगर, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. ही घटना लोहगाव विमानतळावर सोमवारी दुपारी एक वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गौतम शिंदे व महंमद देसाई दोघे जण त्यांच्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी विमानतळावर आले होते. त्यांची मैत्रिणी जयपूरला पुणे ते जयपूर या एअर एशिया विमानाने जाणार होती. त्यांनी पुणे ते जयपूर या एअर एशिया विमान कंपनीचे (Air Asia Flight) बनावट तिकीट मोबाईलमध्ये एडिट केले. ती तिकीटे खोटी असताना खरी असल्याचे भासवून विमानतळाच्या अंतर्गत भागात प्रवेश केला. त्यांची मैत्रिणी गेल्यानंतर ते पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागले. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांच्याकडील तिकीटांची तपासणी केल्यावर ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे सुरक्षा दलाकडून पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Web Title : Pune Crime | It cost them dearly to enter Lohgaon airport with girlfriend; Know the case viman nagar police station CISF Pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला