Pune Crime | IT इंजिनिअर महिलेला Tinder Dating App वरील ओळख पडली महागात; लग्नाच्याआमिषाने 73 लाखांचा गंडा

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | टिंडर डेटिंग अ‍ॅपवर (Tinder dating app) ओळख झालेल्या एका भामट्याने आयटी अभियंता (IT Engineer) असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. पुण्यातील (Pune Crime) वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीत हा प्रकार घडला असून भामट्याने महिलेची तब्बल 73 लाख 59 हजार 530 रुपयांची फसवणूक (Cheating) केली आहे. हा प्रकार जून 2021 ते जुलै 2021 या कालावधीत घडला असून 35 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.13) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ही उच्चशिक्षित असून आयटी अभियंता म्हणून एका आयटी कंपनीत नोकरी करते. महिलेने लग्नासाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर सर्चिंग केले. यामध्ये टिंडर डेटिंग अ‍ॅपवरुन एस. रवी (S. Ravi) नावाच्या प्रोफाइल धारकाशी ओळख झाली. त्यानंतर रवीने महिलेला व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक दिला. त्यानंतर सिद्धार्थ रावी (Siddharth Ravi) नाव सांगितले. तसेच आणि एका व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देऊन जेनी रवी (Jenny Ravi) नाव सांगितले. त्यानंतर महिलेसोबत ओळख वाढून तिचा विश्वास संपादन केला. तसेच लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष (Pune Crime) दाखवले.

Pizza मिळाला नाही म्हणून 18 वर्षाच्या मुलीनं दिला जीव, वाढदिवसाच्या 2 दिवसानंतर निघाली अंत्ययात्रा

याच दरम्यान आरोपीने महिलेला महागडे गिफ्ट दिले. त्यामुळे महिलेचा आरोपीवर विश्वास बसला.
यानंतर महिलेला भेटण्यासाठी भारतात (India) आलो असल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळ कस्टम ऑफिसरने (Delhi Airport Customs Officer) पकडले असल्याची माहिती महिलेला दिली. ही रक्कम सोडवण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, दंड, जीएसटी (GST) तसेच इतर अनेक कर भरायचे आहेत, अशी वेगवेगळी कारणे सांगितले. महिलेला बँकांचे खाते नंबर देऊन त्यावर 73 लाख 59 हजार 530 रुपये भरण्यास भाग पाडले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे (Cyber cell) अर्ज करुन तक्रार दाखल (Pune Crime) केली.
त्यानुसार चौकशी करुन वाकड पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक ए.बी. जगताप (PSI A.B. Jagtap) करीत आहेत.

हे देखील वाचा

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

NCB च्या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा नवीन गौप्यस्फोट, केले अतिशय गंभीर आरोप (व्हिडीओ)

Nora Fatehi | 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कार्यालयात पोहचली नोरा फतेही, जॅकलीनची सुद्धा पुन्हा होणार चौकशी (व्हिडीओ)

Rupali Chakankar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं – रूपाली चाकणकर

Udayanraje Bhosale |  उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | IT engineer woman Tinder Dating App; cheating of Rs 73 lakh for marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update