Pune Crime | दहा महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न, अनैतिक संबंधातून पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह चौघांना अटक; पुणे जिल्ह्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर (Vadgaon Nimbalkar) येथून दहा महिन्यापूर्वी बेपत्ता (Missing) झालेल्या तरुणाचा खून (Murder) झाल्याचे पोलीस (Pune Police) तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch (LCB) चार जणांना बेड्या ठोकून (Arrest) गुन्हा उघडकीस आणला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मयत तरुणाच्या पत्नीचा समावेश असून पोलिसांनी पत्नीसह चार जणांना (Pune Crime) अटक केली आहे. अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) पत्नीने साथीदाराच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले.

 

वैभव विठ्ठल यादव (वय -31, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती (Baramati Taluka) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वैभव यादव याची पत्नी वृषाली (वय -23), तिचा प्रियकर रोहित दत्तात्रय खोमणे (दोघे रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे), साथीदार सागर सर्जेराव चव्हाण (वय-27), शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सूर्यवंशी (वय-23, रा. वडगाव तुकाई माता चौक, ता. बारामती, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. वैभव यादव 19 फेब्रुवारी 2022 रोजी घरातून बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी वृषालीने वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchandnagar Police Station) दिली होती. (Pune Crime)

 

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करत होते. पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पथके तयार करत तपास सुरु केला असता वृषालीचे आरोपी रोहित खोमणे याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन वृषाली, रोहित आणि साथीदारांना ताब्यात घेतले. चौकशीत अनैतिक संबंधातून वैभवचा खून केल्याचे समोर आले.

आरोपींनी वैभव यादव याला मारहाण करुन त्याला सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील कालव्यात फेकून दिल्याची कबुली दिली.
याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता लोणंद पोलीस ठाण्यात (Lonand Police Station)
याबाबत अकस्मात मयत दाखल असल्याचे समजले. तसचे मयताची ओळख पटली असल्याचे दिसून आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal), अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Officer Ganesh Ingle)
याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke),
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे (API Somnath Lande), पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे (PSI Shivaji Nanavare)
पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ यांनी केली.

 

Web Title :-  Pune Crime | It turns out that the youth who went missing 10 months ago was murdered, four people, including the wife, were arrested for killing her husband in an immoral relationship; Incidents in Pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Katrina Kaif | कतरिनाचा चेहरा बघून चाहते झाले नाराज; म्हणाले कि….

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी भाजपचे मिशन 45! शिवसेना-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले निशाण्यावर