Pune Crime | 21 वर्षीय महिलेचं पतीच्या मित्राशी ‘जुळलं’, पत्नीनं त्याच्याशी ‘झेंगाट’ असल्याचं नवर्‍याला सांगितलं, नंतर ‘लफडं’ पोलिसांपर्यंत गेलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पतीच्या मित्राबरोबर तिचे प्रेमसंबंध जमले. पतीला घटस्फोट दे, आपण लग्न करु, असे सांगून त्याने तिच्याबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्याच्या म्हणण्यानुसार तिने पतीला हे सर्व सांगितले. पती घटस्फोट (divorce) देण्यास तयार झाला, पण आता त्याच्या मित्राने लग्नास नकार दिला. ना पतीजवळ करेना आणि त्याचा मित्र अशा अवस्थेत या महिलेने पोलिसांकडे धाव घेत बलात्काराची फिर्यादी दिली (Pune Crime) आहे.

या प्रकरणी एका 21 वर्षाच्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात chikhali police station ( गु. र. नं. 505/21) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित राजेंद्र क्षीरसागर Abhijit Rajendra Kshirsagar (रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध 376 (2), एन, 417 कलमाखाली गुन्हा (Rape Case) दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 पासून आतापर्यंत फिर्यादीचे राहते घरी, मिडाज लॉज येथे घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Pune Crime) हा फिर्यादी यांच्या पतीचा मित्र आहे. पतीचा मित्र असल्याचा गैरफायदा घेऊन प्रथम फोनवरुन मैत्री केली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ऑगस्ट 2020 मध्ये आरोपीने फिर्यादी यांना बाहेर फिरायला जाऊ असे सांगून डुडुळगाव (dudulgaon) येथील मिडाज लॉजमध्ये नेले. तेथे त्याने फिर्यादी यांना ‘‘तू तुझ्या नवर्‍याला सोड, त्याचेकडून घटस्फोट घे, तूझा नवरा काही कामाचा नाही. मी त्याला चांगले ओळखतो, तुझा घटस्फोट ज्या दिवशी होईल, त्यादिवशी मी तुझ्याशी लग्न करतो, ’’असे सांगून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध निर्माण केले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याला आपण पळून जाऊन लग्न करु असे म्हणाले असताना त्याला त्याने नकार देऊन तु तुझ्या नवर्‍याला आपले प्रेमसंबंधाबाबत सांगून टाक, घटस्फोट घे, आपण लग्न करुन असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून 2 महिन्यांपूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी पतीला हा सर्व प्रकार सांगितला.

पतीने त्यांच्या मित्राला बोलावून घेतले. त्यानेही प्रेमसंबंधाबाबत त्यांच्या पतीला सांगितले.
फिर्यादी यांचे पती त्यांना घटस्फोट देण्यास तयार झाले. परंतु, त्यानंतर आरोपी याला फिर्यादी यांनी मोबाईलवर वारंवार फोन केला असता,
त्याने फिर्यादी यांच्यांशी लग्न करणार नसल्याचे सांगून लग्नास नकार दिला.
त्यामुळे आपली फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने फिर्याद (Pune Crime) दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सय्यद तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | It was expensive to trust her husband’s friend; The husband was ready to divorce, but his friend refused to marry her

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 42 वर्षीय महिला डॉक्टरच्या लैंगिक संबंधाबाबत व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर मॅसेज; अश्लिल संभाषण करणारा पुण्यातील डॉक्टर ‘गोत्यात’

44 कोटी SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्यापासून 3 दिवस ‘या’ वेळेत करू शकणार नाही पैशांचा व्यवहार; जाणून घ्या का?

Digital Devices For Education | कशी शिकणार ‘न्यू इंडिया’ ! गुजरातसह ‘या’ 7 मोठ्या राज्यांमध्ये किमान 40% शाळकरी मुलांकडे डिजिटल डिव्हाईस नाही