Pune Crime | अजित नागरी पतसंस्थेच्या मॅनेजरनेच घातला गंडा; अभिषेक चोरघडे, अभिजित बनसोडे यांच्याविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अजित नागरी पतसंस्थेच्या (Ajit Nagari Patsanstha) मॅनेजरने इतरांच्या मदतीने पतसंस्थेच्या सभासददारांच्या खात्यातील पैसे काढून घेऊन ८ लाख ६१ हजार ७०० रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सतीश महादेव जाधव Satish Mahadev Jadhav (वय ४७, रा. हरिओम सोसायटी, सासवड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११०४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतसंस्थेचा मॅनेजर अभिषेक संपत चोरघडे (Manager Abhishek Sampat Chorghade), सुगंधा अनिल बब्बे (Sugandha Anil Babbe), अभिजित बनसोडे (Abhijit Bansode) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या उरुळी देवाची शाखेत (Uruli Deva Branch) २९ ऑक्टोबर २०२० ते २० नोव्हेबर २०२० दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित नागरी पतसंस्थेच्या उरळी देवाची शाखेत अभिषेक चोरघडे हा मॅनेजर होता. त्याने इतर दोघांच्या मदतीने पतसंस्थेचे सभासद अतुल पवार (Atul Pawar) यांचे मुदत ठेव पावती खात्यावरील मोबाईल नंबर चेंज करुन देतो, असे बोलून वेळोवेळी खोट्या सह्या करुन त्याच स्वरुपाची दुसरी पावती करुन ८ लाख ६१ हजार ७०० रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली आहे. याबाबत तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक खेडकर (Sub-Inspector of Police Khedkar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- PPune Crime | It was the manager of Ajit Nagari Credit Institution
who did the trick; FIR against Abhishek Chorghade, Abhijit Bansode

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा