Pune Crime | नोकरांनीने घरमालकीणीला दिलं गुंगीचं औषध, बेशुद्ध करुन पळवला लाखोंचा ऐवज

पुणे / हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरात काम करणाऱ्या नोकरांनी घराच्या मालकिणीला आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर नोकरांनीने घरातील कपाटातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold jewelry), रोख रक्कम (cash) घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. पुण्यातील बावधन येथील गोल्डन आर्च सोसायटीमध्ये (Golden Arch Society Bavdhan) मंगळवारी (दि.7) रात्री सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

 

याप्रकरणी हितेश सुभाषचंद्र धिंग्रा Hitesh Subhash Chandra Dhingra (वय-46 रा. रो हाऊस 2 बी, गोल्डन आर्च सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर व त्याची पत्नी पुजा (दोघे रा. नेपाळ) यांच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश धिंग्रा यांची बहीण श्रुती रवी खोसला (Shruti Ravi Khosla)
यांच्या घरात आरोपी किशोर आणि त्याची पत्नी पूजा दोघेजण घरकाम (domestic servant) करत होते.
आरोपींनी श्रुती आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे ते तिघे बेशुद्ध झाले.
त्यानंतर आरोपींनी घरातील लोखंडी लॉकर तोडून तसेच लाकडी कापाटे उघडून दीड लाख रुपये रोख रक्कम,
सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर (PSI Sandeep Borkar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | items stolen domestic servants Hinjewadi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा