Pune Crime | येरवडा कारागृहात जेल पोलीसाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; ससूनमध्ये उपचार सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा कारागृहात (Yerwada Jail) कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने आज पहाटे स्वत: वर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न (Attempt To Suicide) केला आहे. (Pune Crime)

 

अमोल माने (Amol Mane) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. अमोल माने यांच्यावर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचार करण्यात येत आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने हे येरवडा कारागृहात जेल पोलीस (तुरुंग रक्षक) म्हणून कार्यरत आहेत. त्यांना काल गार्ड ड्युटी होती. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली (Pune Crime). हा प्रकार समजताच त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कौटुंबिक कारणावरुन त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Jail police Attempted suicide by firing in Yerawada Jail; Treatment in Sassoon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा