Pune Crime | पुण्यात शिवप्रतापदिनी चिथावणीखोर भाषण, 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे व अकोल्याचे कालीचरण महाराज यांच्यासह 6 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शिवप्रताप दिन (Shivpratap Din) कार्यक्रमात मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील, तसेच धार्मिक श्रद्धांचा अपमान करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police Station) समस्त हिंदु आघाडी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (Samast Hindu Aghadi President Milind Ekbote) यांच्यासह 6 जणांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

मोहनराव शेटे (Mohanrao Shete), दीपक बाबुलाल नागपूरे (Deepak Babulal Nagpure), कालीचरण महाराज Kalicharan Maharaj (रा. अकोला), कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान) आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे (Nandkishor Ramakant Ekbote) अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे (Pune Crime) आहेत.

शुक्रवार पेठेतील नातुबाग मैदान येथे समस्त हिंदु आघाडी संघटनेतर्फे शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वधाचा आनंदोत्सव या कार्यक्रमाचे 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकबोटे (Milind Ekbote) यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. समस्त हिंदु आघाडीच्या वतीने दरवर्षी प्रतापगडावर (Pratapgad) शिवप्रतापदिन साजरा केला जातो. पण गेल्या काही वर्षापासून तेथे हा उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.

याप्रकरणात यापूर्वी सातारा पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यंदा हा कार्यक्रम पुण्यात (Pune News) आयोजित केला होता.
या वेळी भाषण करताना मिलिंद एकबोटे यांनी मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य केले.
धार्मिक श्रद्धांचा अपमान करुन धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याचे उद्देशाने व बुद्धीपुरस्पर व दृष्ट उद्देशाने हावभाव करुन चिथावणीखोर भाषण केले.
सुत्र संचालन करणारे नंदकिशोर एकबोटे यांनी त्यांच्या भाषणांचा त्यांच्या बोलण्यात पुन्हा थोडक्यात उल्लेख करुन
तेथे जमलेल्या लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची क्लिपची पडताळणी करुन त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Kalicharan Maharaj of Akola along with Samast Hindu Aghadi president Milind Ekbote booked-for-making-provocative-speeches-in khadak police station of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल; 32 वर्षीय महिलेची पोलीस ठाण्यात धाव, प्रचंड खळबळ

Municipal Election Pune Division | पुणे विभागातील 41 नगरपालिकांवर ‘प्रशासकराज’, निवडणुका लांबल्याने निर्णय

Pune Food Poisoning Navguru Institute | भोर येथील नवगुरु इंस्टिट्यूटमधील 28 मुलांना विषबाधा; 6 जणींची तब्बेत खालवल्याने ससूनमध्ये दाखल