Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन ‘कल्याणी प्रधान’ यांची आत्महत्या; पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन उडी (Jump) मारुन एका विवाहितेने आत्महत्या (Suicide) केली. ही घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली आहे. विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime) कल्याणी अजितकुमार प्रधान Kalyani Ajitkumar Pradhan (वय-32) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. कल्याणी यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या (Suicide In Pune) केली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेची वानवडी पोलीस (Wanwadi Police) ठाण्यात नोंद झाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरातील ड्रीम्स आकृती (Dreams Akruti Society) या उच्चभ्रू सोसायटीमध्ये कल्याणी आणि तिचे पती राहतात. तीन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांचे पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) आहेत. मंगळवारी दुपारी कल्याणी यांनी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. (Pune Crime)

 

घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवला.
कल्याणी यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नसून वानवडी पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड (Senior Police Inspector Deepak Lagad)
यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Kalyani Ajitkumar Pradhan suicide by jumping from the eighth floor dies dreams akruti society in wanwadi police station area, ajitkumar is software engineer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

 

Mayor Murlidhar Mohol | समाविष्ट गावांच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध : महापौर मोहोळ

 

Maharashtra Government Employees | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! महागाई भत्ता 3 टक्के वाढणार?