Pune Crime | सराईत वाहनचोराला खडक पोलिसांकडून अटक, 2 लाखांची वाहने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रिक्षा, दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत वाहन चोराला (Vehicle thief) खडक पोलिसांनी (khadak police) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक रिक्षा आणि दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth) साठे उद्यानाजवळ करण्यात आली आहे. विनायक भारत कोळी Vinayak Bharat Koli (वय-26 रा. लोहियानगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

खडक पोलीस ठाण्याच्या (khadak police station) हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने तपास पथकातील पोलिसांना वाहन चोरांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तपास पथकाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले जात असताना पोलीस अंमलदार रवी लोखंडे (Ravi Lokhande) आणि संदिप तळेकर (Sandeep Talekar) यांना सराईत गुन्हेगार विनायक कोळी याने शिवाजी महाराज रोडवरुन एक रिक्षा चोरली असून तो शुक्रवार पेठ येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

 

पोलिसांनी शुक्रवार पेठ येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने एक रिक्षा, एक केटीएम बाईक (KTM Bike) आणि एक अ‍ॅक्टिव्हा (Activa) गाडी चोरल्याची कबुली दिली. आरोपीने केटीएम दुचाकी रबाळे पोलीस ठाण्याच्या (Rabale Police Station) हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीवर खडक, देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विवेक पाटील (DCP Vivek Patil)
अतिरिक्त कार्यभार परिमंडळ 1, सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Shrihari Bhairat),
पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे (Police Inspector Harshvardhan Gade), पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (PSI Rahul Khandale),
शंकर कुंभारे (PSI Shankar Kumbhare), पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप पाटील, संदीप तळेकर, रवी लोखंडे, विशाल जाधव,
राहुल मोरे, हिंमत होळकर, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, सागर घाडगे, किरण शितोळे, महेंद्र पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Khadak police arrest vehicle thief, seize 2 lakh vehicles

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Disha Patani Bikini Photoshoot | दिशा पटानीचा बिकिनी लूकमधील जबरदस्त फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 4 महिला डॉक्टरांचा ‘सामूहिक’ विनयभंग

 

Pune Corporation | महापालिकेने रामटेकडी येथे ‘डंप’ केलेला कचरा ठेकेदाराकडून सोरतापवाडी येथे ‘रिडंप’?