Pune Crime | ‘हम जेल काट के आय है’ म्हणत गुंडांनी माजविली दहशत ! शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये दोन गटात राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन पाटील इस्टेटमध्ये दोन गटात हाणामारी होऊन त्यात तलवार, कोयता, हॉकीस्टीकने परस्परांवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) करण्यात आला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police) दोन्ही गटावर खूनाचा प्रयत्न (Half Murder IPC 307) केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. (Pune Crime)
याप्रकरणी उमेश गोरख सावंत (वय ३२, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. २३४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदिल शेख, तौसिफ ऊर्फ अमन शेख (वय २२), अल्ताफ मोहम्मद शेख (वय २०), आसिफ शेख, गफुर व त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ व अल्ताफ शेख हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडला होता. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल शेख याला चाकचाकीचा धक्का लागला होता. त्यावरुन उमेश सावंत याच्याबरोबर भांडणे झाली होती. उमेश सावंत, त्याचा भाऊ विकास सावंत व विकी लोखंडे, अजय लोखंडे हे रात्री पाटील इस्टेटमध्ये गप्पा मारत उभे होते. त्यावेळी संगमवाडी रोडवर एक चारचाकी कारचा पुढील बंपर निघून खाली रोडवर घसरत होता. उमेश याने त्याला आवाज देऊन सांगितले. त्यांनी गाडी थांबवली. उमेश हा बंपर बांधण्यासाठी मदत करत होता. त्यावेळी अमन शेख व अल्ताफ शेख व इतर तिघे तेथे आले. आदिल याने याने वो क्या तेरा बाप है क्या तेरा क्या संबंध असे म्हणून भांडणे काढून मारहाण केली. आसिफ पटेल यांनी ही भांडणे सोडविली. त्यानंतर रात्री अकरा वाजता ते घराजवळ बोलत असताना आदिल इतरांना घेऊन आला. त्यांनी विकी लोखंडे, अजय लोखंडे व विकास सावंत यांचे डोक्यात, हातावर पंज्यावर कोयता, तलवार याने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन हातातील हत्यारे फिरवत हम जेल काट के आये है,
हमारा बाल बाका नही कर सकते़ असे बोलून दहशत निर्माण केली.
याविरोधात मदिना गफुर सय्यद (वय ३०, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. २३५/२२) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी उमेश सावंत, विकी लोखंडे, आकाश लोखंडे, विकास लोखंडे, राहुल लोखंडे, करण सावंत,
अर्जुन सावंत (रा. पाटील इस्टेट) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा आदिल याचे वस्तीत भांडणे झाली
असल्याचे समजल्याने फिर्यादी या आदिल याला घरी चल असे म्हणून घरी घेऊन जात होत्या.
यावेळी उमेश सावंत इतर हॉकी स्टिक घेऊन आले. त्यांनी आदिल यांच्या डोक्याला, हाताला, पाठीवर मारहाण केली.
त्यात ठिकठिकाणी जखमी होऊन आदिल खाली पडला.
तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन गल्लीत हत्यारे हवेत फिरवत मोठ मोठ्याने ओरडत निघून गेले.
पोलिसांनी दोन्ही गटावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title :- Pune Crime | Khadki Police Attempt To Murder Case Two Groups Patil Estate Shivajinagar Pune Crime News
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update