Pune Crime | खेड-शिवापूर टोलनाक्यावर 14 लाखांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-सातारा (Pune Crime) महामार्ग खेड-शिवापूर टोलनाक्यावर (Khed-Shivapur Tollnaka) टेम्पोमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या 14 लाख 17 हजार 500 रुपयांचा गुटखा राजगड पोलिसांनी (Rajgad Police) जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (21 जानेवारी) रोजी करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कानाराम मिश्रिलाल चौधरी (Kanaram Mishrilal Chaudhary) (वय 32) व देवेंद्र गणपतलाल मेघवाल (Devendra Ganpatlal Meghwal) (वय 25, दोघेही रा. वडगाव, हवेली, पुणे. मूळ रा. राजस्थान) अशी अटक (Arrested) करण्यात केलेल्याची नावे आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, एक गुटखा वाहतूक करणारा टेम्पो शुक्रवारी पहाटे पुणे सातारा रस्त्याने पुण्याच्या बाजूला जाणार असल्याची माहिती राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) यांना मिळाली होती. त्या माहितीनूसार पोलिस निरीक्षक पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ (Khed Shivapur Toll Plaza) सापळा रचण्यात आला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे 1 टेम्पो पुण्याच्या दिशेने जाताना निदर्शनास आला. यावेळी या टेम्पोची तपासणी केली असता त्यात 14 लाख 17 हजार 500 रुपयांची विविध गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची पोती सापडली. हा सर्व मुद्देमाल राजगड पोलिसांनी (Rajgad Police) हस्तगत केला आहे. (Pune Crime)

दरम्यान, सदरची कारवाई राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil)
यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे (API Manoj Kumar Navsare),
सहाय्यक फौजदार कृष्णा कदम (ASI Krishna Kadam), पोलिस हवलदार अजित माने (Police Constable Ajit Mane)
आणि पोलिस नाईक तुषार खेंगरे (Police Naik Tushar Khengare) यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे (API Manoj Kumar Navsare) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | khed shivapur toll plaza gutkha rajgad police action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी थेट मिडियासमोर; म्हणाला…

 

NCP Prashant Jagtap | ‘चंद्रकांत पाटलांना कदाचित महापालिकेऐवजी अजितदादांकडून जास्त अपेक्षा असाव्यात’

 

Lata Mangeshkar | गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही, अद्यापही आयसीयुमध्ये उपचार सुरू !