Pune Crime | जत्रेतील भांडण मिटवणाऱ्या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; पुणे जिल्ह्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दोन गटांत सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण (Beating) करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार (Pune Crime) खेड पोलीस ठाण्याच्या (Khed Police Station) हद्दीतील चाकाळे येथील महालक्ष्मी मंदिराबाहेर मंगळवारी (दि.6) रात्री घडला. याप्रकरणी सहा ते सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत राकेश खेडेकर (रा. शिवतर रोड, खेड) याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पंकज वाडकर, प्रशांत वाडकर, सुमित बर्गे, सागर कदम, रोहन पोर्टे यांच्यासह इतर तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चाकाळे गावचे ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मी देवीची जत्रा होती.
या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. यादरम्यान चिंचघर गावच्या दोन गटांत वाद सुरू झाले.
हे वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रोहन, राकेश आणि त्यांच्या मित्राला पंकज वाडकर व त्याच्या मित्रांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीमध्ये रोहन गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | khed young man went to settle quarrel beaten up a case was registered against seven to eight people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका