Pune Crime | सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण, मारहाण करून लुटले; महिलेसह दोघांवर गुन्हा

पुणे : Pune Crime | सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन घरात शिरुन लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे ताब्यात घेऊन ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करुन मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) एका महिलेसह दोघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ गावातील एका 62 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्याच इमारतीत राहणारी रेश्मा शेख व एक जण 12  ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घरात शिरले. आम्ही सीबीआयचे अधिकारी असल्याची त्यांनी बतावणी केली. घरातील लॅपटॉप, मोबाईल, मोटारीचे स्टार्टर, कागदपत्रे व बँकेचे कागदपत्रे असा 31 हजार रुपयांचा माल घेतला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दमदाटी करुन आम्हाला दीड लाख रुपये द्या नाही तर तुमच्यावर खोटी केस करतो. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर येथे सोडून ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | स्वातंत्र्यदिनी लाच स्विकारताना महिला ग्रामसेवक ACB च्या जाळ्यात

National Hydrogen Mission | भारतात पाण्यावर चालतील रेल्वे गाड्या आणि कार ! PM नरेंद्र मोदी यांनी केले नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा

PM-Kisan Scheme | जर तुमच्या खात्यात आला नाही 9 वा हप्ता, तर ‘या’ Toll Free नंबरवर करा कॉल; होईल पूर्ण ‘समाधान’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Kidnapping, beating and robbing a senior citizen claiming to be a CBI officer; Crime on both, including the woman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update