Pune Crime | चाकूच्या धाकाने भर दिवसा दोघा तरुणांचे अपहरण; Google Pay द्वारे दीड लाखाची खंडणी ‘वसुल’

पुणे / पिंपरी : Pune Crime | मोटारीतून आलेल्या चौघा चोरट्यांनी दोघा तरुणांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले. त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडून गुगल पे (Google Pay) द्वारे दीड लाख रुपये खंडणी (Ransom) वसुल केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. हा प्रकार चाकणजवळील (Chakan) भांबोली फाटा, वराळे दरम्यान १८  ऑक्टोबर रोजी घडला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी मोहम्मद अहमद सगीर (वय २८, रा. वासोली फाटा, एमआयडीसी चौक, खेड, मुळ रा. दुमदुमवा, सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात Chakan Police Station (गु. र. नं. १२९२/२१) फिर्याद (Pune Crime) दिली आहे. त्यावरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगीर व मुक्तार खान हे भांबोली फाटा येथे असताना मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून गाडीत बसविले. त्यांचे अपहरण (Kidnapping) केले. पकडीने हाताचे बोट कापण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील ५० हजार रुपये जबरदस्तीने (Pune Crime) काढून घेतले. तसेच त्यांच्याकडून गुगल पेद्वारे सौरभ वसंत टोपे याच्या नावावर २५ हजार रुपये, २५ हजार रुपये आणि ५० हजार रुपये असे तीन वेळा पैसे पाठविण्यास भाग पाडून खंडणी (Extortion) वसुल केली व त्यांना सोडून पळून गेले.

हे देखील वाचा

Pune News | ‘फडणवीस खड्डा’, ‘चंपा खड्डा’, ‘महापौर खड्डा’; पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे नामकरण, शिवसेनेने केले अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

7th Pay Commission | खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युएटीचे 476 कोटी मिळणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Kidnapping of two youths with a knife; ransom via Google Pay Rs 1.5 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update