Pune Crime | व्याजाने दिलेले पैसे न दिल्याने तरुणाचे भोसरीतून अपहरण; हवेली पोलिसांनी सराईत गुंडासह दोघांना घेतले ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाने दिलेले पैसे (Money On Interest) परत न केल्याने एका तरुणाचे भोसरीतून (Bhosari) अपहरण (Kidnapping) करुन त्याला कोल्हेवाडी (Kolhewadi) येथे आणले असताना हवेली पोलिसांनी (Haveli Police) त्यांचा शोध घेऊन तरुणाची सुटका केली. सराईत गुंडासह दोघांना पकडून भोसरी पोलिसांच्या (Bhosari Police) ताब्यात दिले. (Pune Crime)

 

राहुल संजय पवार Rahul Sanjay Pawar (वय ३९, रा. म्हाळुंगे, ता. खेड) आणि नितीन पोपट तांबे Nitin Popat Tambe (वय ३३, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) अशी या दोघांची नावे आहेत. संजय पवार हा सराईत गुन्हेगार (Pune Criminals) असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) तडीपार केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहताष कुमार (रा. चिखली) याने राहुल पवार व नितीन तांबे यांच्याकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते.
त्याने ते व्याजासह परत दिले होते. तरीही ते पैसे परत मागत होते.
त्याला कुमार याने नकार दिला. त्यामुळे या दोघांनी बुधवारी सायंकाळी कुमार याला जबरदस्तीने गाडीत घालून त्याचे अपहरण केले (Pune Crime).
त्याला निमगाव (Nimgaon), खेड (Khed), चाकण (Chakan), खेडशिवापूर (Khed Shivapur) येथे फिरवले.
त्यानंतर त्याला खडकवासला (Khadakwasla) जवळील कोल्हेवाडी येथे आणले होते.
भोसरी पोलिसांनी ही माहिती हवेली पोलिसांना दिली.
या माहितीनुसार, हवेली पोलीस शोध घेत असताना त्यांना एक संशयास्पद कार पुण्याकडे (Pune News) जाताना दिसली.
पोलिसांनी कार थांबवून त्यातील लोकांची चौकशी केल्यावर ज्यांचा शोध घेत आहोत, तेच आरोपी कारमध्ये असल्याचे पोलिसांना लक्षात आले.
हवेली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन भोसरी पोलिसांच्या हवाली केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Kidnapping of youth from Bhosari for Money Haveli police arrested two persons along with a goon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा