Pune Crime | कोंबडीचे मटण का आणले नाही म्हणत डोक्यात दगड घालून खून; लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोंबडीचे मटण का आणले नाही, याकारणावरुन महिला व तिच्या मुलीला मारहाण करीत असताना त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या पतीच्या डोक्यात दगड घालून खून (Murder In Pune) करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

शंकर नायक Shankar Nayak (वय ३५, रा. रानवारा हॉटेलसमोर, केसनंद वाडेबोल्हाई रोड, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) विकास भोसले (Vikas Bhosale), कविता भोसले (Kavita Bhosale),
बल्ला अशा तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार रानवारा हॉटेलसमोर बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला आहे.
याबाबत मेहबु शंकर नायक Mehbu Shankar Nayak (वय ४०) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station)
फिर्याद (गु. रजि. नं. ४१७/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत.
यातील आरोपी विकास भोसले यांनी फिर्यादी यांना कोंबडीचे मटण का आणले नाही, असे म्हणून त्यांनी फिर्यादी व त्यांचे मुलीस मारहाण करु लागले.
तेव्हा फिर्यादी यांचे पती शंकर नायक हे भांडणे सोडविण्यासाठी आले.
त्यावेळी त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) करुन जखमी केले.
तेथे पडलेला दगड शंकर नायक यांच्या डोक्यात घालून त्यांना जीवे ठार मारले.
सहायक पोलीस निरीक्षक पवार (Assistant Police Inspector Pawar) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | Killed by throwing a stone on the head saying why they did not bring chicken mutton Incidents in Lonikand area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा