Pune Crime | लव्ह मॅरेज झाले असताना दुसरीवर जडला जीव, प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीसोबत केलं भयानक कांड; पुणे जिल्ह्यातील घटना

0
382
Pune Crime | killed his wife with deadly drugs to marry again incidents in mulshi taluka ghotawade fata pune district
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेयसी बोलत नसल्याने तिचा गळा चिरुन खून केल्याची घटना चाकणमध्ये घडली होती. ही घटना ताजी असतानाच मुळशी तालुक्यात संतापजनक घटना (Pune Crime) घडली आहे. प्रेमविवाह केल्यानंतर दुसऱ्या तरुणीवर जीव जडला. दुसऱ्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा येथील एका आय.सी.यु. वॉर्डमध्ये स्वप्निल विभिषण सावंत (वय-23 रा. सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) हा काम करत होता. काही दिवसांपूर्वी प्रियांका क्षेत्रे (वय-22) हिच्यासोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता. गेल्या पाच महिन्यापासून ते दोघे कासार आंबोली येथे एका खोलीत राहात होते. मात्र, दरम्यानच्या काळात स्वप्निल याचे हॉस्पिटलमधील एका परिचारिकेसोबत प्रेमसंबंध जुळले. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. (Pune Crime)

मात्र, पहिले लग्न झाल्याने त्याला दुसरे लग्न करता येत नव्हते. केवळ दुसरे लग्न करण्यासाठी स्वप्निल याने पत्नी प्रियांकाला राहत्या घरी ठार केले. त्यानंतर उपचाराचा बहाणा करत घोटावडे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी प्रियांकाला तपासून मृत घोषित केले आणि पौड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची खबर दिली.

दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रियांकाच्या घरच्यांना धक्का बसला. त्यांनी पौड पोलीस ठाण्यात मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर पौड पोलिसांनी तपास केला असता स्वप्निल यानेच प्रियांकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

असा केला खून

आरोपी स्वप्निल याने पत्नी प्रियांका हिचा खून करण्यासाठी शांत डोक्याने विचार केला.
तो ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होता तेथून त्याने कोणाला काही न कळता काही घातक औषध चोरुन
घरी आणली. ज्यावेळी प्रियंकाचे डोकं दुखत होतं त्यावेळी उपचार करण्याच्या बहाण्याने स्वप्निल याने तिला
इंजेक्शन मधून लो बीपी आणि लो शुगर होण्याचे औषधं दिली. यामुळे प्रियांकाचा मृत्यू झाला.
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,
उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पवन चौधरी,
पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलिस हवालदार आनंदा बाठे,
संदिप सपकाळ, दिपक पालखे, पोलीस नाईक सिध्देश पाटील, प्रशांत बुनगे, नामदेव मोरे, गणेश लोखंडे
पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील यांनी केला आहे.

Web Title :- Pune Crime | killed his wife with deadly drugs to marry again incidents in mulshi taluka ghotawade fata pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | माजी सैनिकाकडून नोझल मशीनच्या स्टॅम्पिंगसाठी लाच मागणारा अधिकारी अटकेत, जालन्यातील घटना

Shraddha Walker Murder Case | श्रद्धाच्या पत्रावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु