Pune Crime | टपरीचालकावर धारदार हत्याराने वार; कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पानटपरीचालकावर चाकूने सपासप वार करून त्याच्याकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड टोळक्याने जबरदस्तीने चोरून नेली. या घटनेत पानटपरीचालक जखमी झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि.4) रात्री अकराच्या सुमारास कोंढवा येथील एनआयबीएम रोडवर ( Pune Crime) घडला.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

फिर्यादी याची पानटपरी असून, रविवारी रात्री टोळके त्या ठिकाणी आले. टोळक्याने तरुणाला धमकावत त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. तसेच त्याच्या गल्ल्यातील साडेतीन हजार रुपये चोरून नेले. या घटनेत पानटपरीचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More | वसंत मोरे मनसे सोडण्याच्या तयारीत?; लग्नसमारंभात अजित पवारांची घेतली भेट

Taj Mahal | ताज महालसंबंधीची याचिका न्यायालयाने फेटाळली

Pimpri Chinchwad-PCMC News | कार्यशाळेस दांडी मारणे पीसीएमसीतील पदाधिकाऱ्यांना पडले महागात; थेट कारवाईचा इशारा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

Mumbai Crime | वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील फिल्म बनवणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा

Malaika Arora | ‘छैया छैया’ या गाण्यासाठी मलायका अरोरा नव्हे, तर शिल्पा शेट्टीसह ‘या’ अभिनेत्रींना दिली होती ऑफर