Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल (Pistol) आणि तीन जिवंत काडतुसे (Cartridge) जप्त केली आहेत. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) बोपदेव घाटातील (Bopdev Ghat) टेबल स्पॉटवर (Table Spot) केली.

 

प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे Prasad alias Sonya Maruti Sable (वय – 20 रा. प्रगती सी – 12 घरकुल, चिखली, चिंचवड – Chinchwad, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दुचाकी आणि घरफोडीच्या (Burglary) गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार गणेश चिंचकर (Ganesh Chinchkar) व तुषार आल्हाट (Tushar Alhat) यांना बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर एक जण थांबला असून तो कोणाची तरी वाट पाहात आहे. त्या व्यक्तीकडे पिस्टल सारखे दिसणारे हत्यार असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, प्लॅसिटिकच्या लहान आकाराच्या डबीत तीन जिवंत काडतुसे सापडली. आरोपी विरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) खुनाचा प्रयत्न (Attempt Murder) केल्याचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो फरार असल्याची माहिती तपासात समोर आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil),
पोलीस निरीक्षक गुन्हे गोकुळ राऊत (Police Inspector Gokul Raut)
पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravase),
पोलीस अंमलदार सहायक पोलीस फौजदार असगरअली सय्यद, पोलीस हवालदार योगेश कुंभार, अमोल हिरवे, तुषार आल्हाट,
दिपक जडे, अभिजीत रत्नपारखी, महेश राठोड, जयदेव भोसले यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Kondhwa police arrest criminal for carrying unlicensed pistol

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा