Pune Crime | जामीनावर सुटल्यावर बनावट फेसबुक अकाउंटवरुन केली महिलेची बदनामी, चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची दिली धमकी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून बलात्कार (Rape) केल्याच्या प्रकरणात अटक (Arrest) झाल्यानंतर जामिनावर सुटलेल्या (Released on Bail) आरोपीने संबंधित महिलेला तिच्या घरी जाऊन त्रास दिला. एवढेच नाहीतर महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook Account) तयार करुन तिची बदनामी (Defamation) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी समीर बाळू निकम Sameer Balu Nikam (रा. जिजाऊ बिल्डींग, नऱ्हेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने आरोपी समीर निकम याच्याविरुद्ध मारहाण (Beating) करुन बलात्कार केल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणात समीर याला अटक झाली होती. त्यातून जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर डिसेंबर 2021 पासून तो पुन्हा महिलेला त्रास देऊ लागला. महिला ज्या ठिकाणी राहते तिथे जाऊन तुझा मुलगा माझा आहे, तो मला दे नाहीतर मी कोणत्याही थरला जाऊ शकतो अशी धमकी समीर निकम याने दिली. (Pune Crime)
–
महिलेने याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आरोपीने महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. यावर महिलेची बदनामी होईल असा मजकूर पोस्ट केला. तसेच त्या अकाउंटवरुन महिलेच्या नातेवाईकांना व इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवून त्यावर अश्लील शेरेबाजी करुन महिलेची बदनामी केली. या महिलेच्या मित्रमैत्रिणीला फोन करुन बदनामी केली.
तसेच पतीचा पाठलाग करुन त्यांना ‘मी आता तुमची इज्जत घालवून टाकणार आणि तुझ्या पत्नीला मारुन टाकणार आहे.
जर तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर तुम्हाला एक ऑप्शन आहे.
तुम्ही मला मारुन टाका, नाही तर मी स्वत:च आत्महत्या (Suicide) करतो आणि तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून तुम्हाला अडकून टाकणार. मी तुम्हाला त्रास देणार आणि तुमची बदनामी करणार’ अशी धमकी दिली.
तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Kondhwa Police Station News defamed woman fake facebook account he also threatened commit suicide
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update