Pune Crime | कोंढव्यात निवडणूक निर्णय अधिकारी महिलेला धक्काबुक्की, 8 ते 10 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका सोसायटीच्या आवारामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी (Lady Election Officer) महिलेला धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला अधिकाऱ्याची सोसायटीमधील निवडणुकीसाठी (Society Election In Kondhwa) नेमणूक करण्यात आली होती. याप्रकरणी 8 ते 10 जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपींनी महिला अधिकाऱ्याला घेराव घालून धक्काबुक्की (Pune Crime) केली.

 

याप्रकरणी निवडणूक अधिकारी गौरी लोखंडे Gauri Lokhande (वय-42) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खान नावाच्या व्यक्तीसह 8 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढवा येथील एनआयबीएम रोड वरील (NIBM Road) शिवशंकर गिरीजा सोसायटी गृहरचना संस्थेत (Shivshankar Girija Society Housing Society) घडला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सोसायटीच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (State Co-operative Electoral Authority) निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. फिर्यादी आणि त्यांचे सहकारी सोसायटीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सोसायटीच्या आवाराचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. आरोपी खान याने सेक्युरिटी कडे याबाबत विचारणा केली. तसेच सोसायटीच्या आवारात प्रवेश देताना नाव नोंदणी केली का? अशी विचारणा केली.(Pune Crime)

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तुम्ही सोसायटीत आला कसे, असे म्हणत फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांनी सोसायटीच्या आवाराचे केलेले चित्रीकरण डिलीट केले.
यानंतर सोसायटीमधील आठ ते दहा जणांना बोलावून घेत फिर्यादी व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांना घेराव घातला.
त्यांना असभ्य भाषेत बोलून फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना सोसायटीच्या बाहेर जाण्यास मज्जाव केला.
पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक तोरगल (API Torgal) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Kondhwa society lady election officer , FIR against 8 to 10 people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या

 

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’

 

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता