Pune Crime | अंबामातेची चांदीची मुर्ती, हार, निरांजन आणि दागिने चोरणाऱ्या मोलकरीणीला कोरेगाव पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरकाम करण्याच्या (Maid) बहाण्याने घरातील चांदीचे देव आणि दागिने (Silver Jewelry) चोरणाऱ्या (Stealing) मोलकरणीला कोरेगाव पोलिसांच्या (Pune Police) तपास पथकाने 24 तासात अटक (Arrest) करुन चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा प्रकार (Pune Crime) गुरुवारी (दि.10) कोरेगाव पार्क येथील लेन नं.6 येथे उघडकीस आला होता. पोलिसांनी ही कारवाई साऊथ मेन रोडवर (South Main Road) केली.

उज्वला नागनाथ बचुटे (वय-50 रा. फुरसुंगी पुणे, मुळ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हुकुमचंद अमरचंद कोटेचा (Hukumchand Amarchand Kotecha) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

फिर्यादी यांची पत्नी देवपूजा करत असताना देवघरातील अंबामातेची चांदीची मुर्ती (Silver Idol), चांदीचा हार, निरांजन, छोटी वाटी दिसली नाही. त्यांच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेवर संशय व्यक्त केला होता. कोरेगाव पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपी महिलेचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी महिला साऊथ मेन रोडवर थांबली असून बंगल्याची पाहणी करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी महिलेकडून चोरीच्या गुन्ह्यातील 1 किलो 55 ग्रॅम वजनाचे 65 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने आणि देवीची मुर्ती जप्त केली. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी 24 तासात गुन्हा उघडकीस आणून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) , सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे ACP R.N. Raje), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ
(Senior Police Inspector Vinayak Vetal), पोलीस निरीक्षक गुन्हे दिपाली भुजबळ
(Police Inspector Dipali Bhujbal) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे
सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे (API Dattatraya Ligade), पोलीस उप निरीक्षक नामदेव खिलारे
(PSI Namdev Khilare), पोलीस हवालदार रमजान शेख, विजय सावंत, विवेक जाधव, पोलीस नाईक प्रविण पडवळ, महिला पोलीस शिपाई ज्योती राऊत, वैशाली माकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Koregaon police arrested the maid who stole silver gods and ornaments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Leader Ranjit Deshmukh | काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी मंत्र्याची मुलगा आणि सूनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारने लावला ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामाला थांबवण्याचा धडाका

Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?