Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीनं केलं पत्नीच्या मोबाईलमध्ये ‘स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर’ सॉफ्टवेअर डाऊनलोड, पुढं झालं असं काही की प्रकरण…

पुणे : Pune Crime | आपल्या विरोधकांची माहिती मिळविण्यासाठी इस्त्रायली तंत्रज्ञान असलेल्या ‘पेगासस’ नावाच्या स्पायवेअरमुळे सध्या भारतासह अनेक देशांमध्ये वादविवाद सुरु आहे. हा वाद आता असला तरी पुण्यातील एका पतीने संशयावरुन आपल्या पत्नीची गोपनीय माहिती मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरचा ८ वर्षांपासूनच वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पत्नीला समजल्यावर तिला धक्काच बसला. तिने सरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या पतीविरुद्ध फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार बाणेर (Baner) येथे राहणार्‍या ३७ वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.  याप्रकरणी कोथरुडमधील शिवतीर्थनगर येथे राहणार्‍या ३४ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार बाणेर आणि कोथरुडमध्ये २३ डिसेंबर २०१३ पासून ५ मे २०१७ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पतीपत्नी आहेत. फिर्यादी यांच्याकडे त्यांचे पती वारंवार पैशांची मागणी करीत असत. त्यावरुन त्यांच्यात वाद होत होते. फिर्यादीच्या चारित्र्यावर पती संशय घेत असत. त्यावरुन त्यांना शिवीगाळ व मारहाण करीत आहे. फिर्यादी यांना त्यांच्या पतीने २०१३ मध्ये एक मोबाईल भेट दिला होता. या मोबाईलमध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर नावाचे अ‍ॅप अगोदर डाऊनलोड करुन ठेवण्यात आले होते. या अ‍ॅपद्वारे त्यांची सर्व गोपनीय माहिती परस्पर आरोपी पतीने त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक लॅपटॉप व मोबाईलमध्ये घेऊन त्याचा गैरवापर केला. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बडे अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Maharashtra Police | पुणे, नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ ! कम्युनिटी पोलिसिंगवर भर, माहिती तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घालणार्‍या गडचिरोलीला ‘दुहेरी’ यश, औरंगाबाद, रायगडही ‘अव्वल’स्थानी

Pune Corporation | सर्वच वाहनतळ एकाच ठेकेदाराला देण्याच्या निविदेला 4 वेळा मुदतवाढ देऊनही ‘प्रतिसाद’ नाही; ‘झोन’निहाय ‘ग्रुप’ करून स्वतंत्र निविदा काढण्याच्या प्रशासनाच्या हालचाली

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | kothrud police registered crime against husband who download software in wife mobile

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update