Pune Crime | कुंजीरवाडीच्या सरपंच अंजु गायकवाड यांना ‘मोक्का’ न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रोहन काळुराम इंगळे यांना जीवेमारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 17 फेब्रुवारी 2021 रोजी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) गुन्हा (FIR) दाखल झाला होता. त्यामध्ये मुख्य आरोपी शुभम कैलास कामठे Shubham Kamthe (रा. लोणी काळभोर, पुणे) याचेसह 13 आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली होती. आरोपी शुभम कामठेची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पुणे पोलिसांनी (Pune Crime) शुभम कामठे व इतर 11 यांचेविरुद्ध मोक्का अंतर्गत (MCOCA Action) Mokka कारवाई केली होती. विशेष बाब म्हणजे कुंजीरवाडीच्या सरपंच अंजु गायकवाड (Kunjirwadi Sarpanch Anju Gaikwad) यांना देखील मोक्कामध्ये अटक करण्यात आली होती. अंजु गायकवाड यांनी विशेष मोक्का न्यायालयात (special Mocca court) जामीनासाठी अर्ज (Application for bail) केला होता. मोक्का न्यायालयाने गायकवाड यांचा जामीन मंजूर केल्याची माहिती, ॲड.विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijaysingh Thombre) यांनी दिली आहे.

SBI Rules | जर तुमच्या फोनवर येत नसेल OTP तर तात्काळ करा ‘हे’ काम, अशी करता येईल तक्रार; जाणून घ्या

सरपंच अंजु गायकवाड यांनी सरपंच पदाचा गैरवापर करून आरोपी शुभम कामठे याचे शुभम कामठे हे खरे नाव न सांगता आरोपीचे नाव लपवून अक्षय नलावडे असे खोटे नाव सांगून प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी (Primary Health Center Kunjirwadi) येथील वैद्यकीय अधिकारी यांचेशी फोनवर संपर्क करून आरोपी शुभम कामठे याची कोरोनाची टेस्ट (Corona test) करून त्यास मदत केली होती. तसेच आरोपी कामठे यास फरार कालावधीमध्ये मदत केल्याचा आरोप पोलिसांनी सरपंच अंजु गायकवाड यांच्यावर ठेवला होता. आरोपी सरपंच अंजु गायकवाड या सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) असून त्यांना जामीन मिळावा यासाठी ॲड.विजयसिंह ठोंबरे यांनी विशेष मोक्का न्यायाधीश एस.ए.नावंदर (Judge S.A. Navander) यांचेकडे जामीन अर्ज दाखल केला होता.

वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

त्यावेळी सरपंच अंजु गायकवाड यांना केवळ राजकीय द्वेषातुन अडकवण्यात आले असून कोरोनाची टेस्ट करतेवेळी सदर व्यक्ती ही आरोपी असल्याचे सरपंच अंजु गायकवाड यांना माहीत नसल्याचा युक्तिवाद ॲड.विजयसिंह ठोंबरे यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष मोक्का न्यायाधीश एस.ए.नावंदर यांनी आरोपी सरपंच अंजु गायकवाड यांना 15 हजारांच्या रोख रकमेच्या जात मुचलक्याच्या जामिनावर मुक्त केले आहे. आरोपी सरपंच अंजु गायकवाड यांच्या वतीने ॲड.विजयसिंह ठोंबरे, ॲड.शिवम पोतदार (Adv. Shivam Potdar) व अक्षय खडसरे (Akshay Khadsare) यांनी काम पाहीले.

हे देखील वाचा

Parambir Singh Extortion Case | परमबीर सिंह वसूली केसमध्ये गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरूद्ध सुद्धा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

RBI Rules | चेक देण्यापूर्वी करू नका ही चूक, अन्यथा भरावा लागेल दंड! जाणून घ्या RBI चे नवीन नियम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Kunjirwadi Sarpanch Anju Gaikwad granted bail by Mocca court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update