Pune Crime | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त; साडे तीन लाखांचे 11 पिस्टल जप्त (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑानलाइन – Pune Crime | पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने मोठी कारवाई करुन पिस्टलची विक्री (Pistol Sales) करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला (Pune Criminals) अटक (Arrest) करुन 3 लाख 50 हजार रुपये किमतीच्या तब्बल 11 पिस्टल जप्त केल्या आहेत. तसेच सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल खरेदी करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे (Dnyaneshwar alias Rudra Sarjerao Dukare) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

 

गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सोमवारी (दि. 18) पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पथकाला एक व्यक्ती वाघोली येथील केसनंद रोडवर (Kesnand Road Wagholi) पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे (वय-21 सध्या रा. शनि शिंगणापूर -Shani Shinganapur, ता. नेवासा जि. अहमदनगर -Ahmednagar मुळ रा. मु.पो. टेंभी अंतरवाली, ता. घणसांगवी, जिल्हा. जालना) याला ताब्यात घेतले.(Pune Crime)

 

पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 3 पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे सापडली. त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने तीन जणांना पिस्टल आणि जिवंत काडतुसे (Cartridges) विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी निखील उर्फ सनी बाळासाहेब पवार Nikhil alias Sunny Balasaheb Pawar (वय-23 रा. एमआयटी कॉलेज जवळ, लोणी काळभोर-Loni Kalbhor) याच्याकडून 2 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे, युवराज बापू गुंड Yuvraj Bapu Gund (वय-24 रा. पांडव नगर, वडकी गाव, ता. हवेली) याच्याकडून 1 पिस्टल व 1 जिवंत काडतुस आणि अमोल नवनाथ तांबे Amol Navnath Tambe (वय-27 रा. गोटूंबे आखाडा, ता. राहूरी, जि. अहमदनगर) याच्याकडून 2 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त करुन त्यांना अटक केली. तसेच आरोपी ज्ञानेश्वर डुकरे याच्या घरातून 3 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे जप्त केली.

 

गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने या कारवाईत एकूण 3 लाख 35 हजार 600 रुपये किमतीच्या 11 पिस्टल व 14 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आरोपी शंकर नायर Shankar Nair (रा. उज्जैन) याच्याकडून हे पिस्टल आणून त्याची पुणे परिसरात विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Large arms cache seized from Pune City Police Crime Branch; 11 pistols worth Rs 3.5 lakh seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह 7 जणांवर कौटुंबिक हिंसाचाराखाली गुन्हा दाखल

 

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, हडपसर परिसरातील घटना

 

Solapur-Hyderabad Highway News | सोलापूरमध्ये पुण्यातील कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू; 5 जण गंभीर जखमी