Pune Crime | अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वकिलाने तरुणाला लुबाडले; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime | सोशल मीडियावर (Social Media) झालेल्या ओळखीतून तरुणाला भुरळ पाडुन त्यांच्याबरोबर अनैसर्गिक संबंध (Unnatural Relationship) प्रस्थापित करुन त्याचे फोटो व्हायरल (Photo Viral) करण्याची धमकी (Threat) देऊन जबरदस्तीने कर्ज (Loan) घेण्यास लावून त्या पैशांचा अपहार करुन फसवणूक (Fraud Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी आंबेगाव गावठाण येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६३०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दशरथ बावकर Dasaratha Bawkar (वकील) (वय २७, रा. ताथवडे) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हाप्रकार आंबेगाव गावठाण, तसेच विविध ठिकाणी जानेवारी २०२२ ते २५ सप्टेबर दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दशरथ बावकर यांची फेसबुकवरुन
(Facebook) ओळख झाली. दशरथ याने फिर्यादीशी गोड बोलून त्याला भुरळ पाडली.
फिर्यादीसोबत विविध ठिकाणी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले.
त्याचे नग्न फोटो काढून ही बाब कोणाला सांगितली तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादीच्या कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ७ लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने फिर्यादीच्या आईस तुमच्या मुलाला मायग्रेशनचा आजार आहे,
असे खोटे सांगितले. फिर्यादीचे आईचे व पत्नीचे २० तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry)
घेऊन फिर्यादीस पिंपरी येथे मुथुट फायनान्स (Muthoot Finance) येथे गोल्ड लोन (Gold Loan)
करण्यास लावले. या कर्जाचे आलेले ६ लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादीचे ड्रायव्हींग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड धमकावून काढून घेतले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव (Sub-Inspector of Police Jadhav) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Lawyer blackmails young man by threatening to make photos of unnatural relationship go viral; Embezzled money by forcing them to take loans

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kitchen Hacks | कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवूनही सुकते का? ‘या’ 4 पद्धतीने फ्रेश राहतील भाज्या

Kolhapur ACB Trap | भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागणाऱ्या लिपिकावर एसीबीकडून FIR

Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात बारामतीचे तत्कालीन DySP नारायण शिरगावकर आणि पो. नि. भाऊसाहेब पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; सध्या पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले ACP शिरगावकार म्हणाले….