Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळूनही धमकावणारा सावकार अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज वसुल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करुन धमकाविणाऱ्या सावकाराला पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. रमजान मोहंमद खान Ramzan Mohammad Khan (वय 40, रा. शेलार चाळ, येरवडा) असे या सावकाराचे (Pune Crime) नाव आहे.

 

याप्रकरणी विनोद सिद्राम बुधाराम Vinod Sidram Budharam (वय 43, रा. विडी कामगार वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बुधाराम यांनी रमजान खान याच्याकडून ऑगस्ट 2021 मध्ये 50 हजार रुपये व डिसेंबरमध्ये 1 लाख रुपये असे मिळून 1 लाख 50 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने (Interest) घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी मुद्दल व व्याज मिळून एप्रिल 2022 पर्यंत एकूण 2 लाख 12 हजार 250 रुपये परत केले. असे असतानाही फिर्यादी यांना त्याने फोन करुन शिवीगाळ केली. त्यांच्याकडे 10 हजार 40 रुपयांची मागणी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आळेकर (API Alekar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Lender arrested for threatening 10 per cent interest per month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कोंढव्यात गुंडांचा धुडगूस ! पार्क केलेल्या कार, दुचाकी, रिक्षांचा काचा फोडून माजवली दहशत

 

Maharashtra Legislative Council Elections 2022 | विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट ! भाजपकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर

 

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण