×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत खून...

Pune Crime | झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | झोपलेल्या पत्नीच्या (Sleeping Wife) अंगावर रॉकेल टाकून पेटवून (Fire) देत तिचा खून (Murder) करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे (Judge V.A. Patravale) यांनी हा निकाल दिला आहे. गणेश शंकर पासलकर (Ganesh Shankar Pasalkar) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे 19 सप्टेंबर 2015 रोजी पहाटेच्या सुमारास घडला होता. मनिषा गणेश पासलकर Manisha Ganesh Pasalkar (वय – 20 रा. भिवरी, पुरंदर) असे मृत्यू झालेल्या (Pune Crime) पत्नीचे नाव आहे.

 

गंभीर भाजलेल्या मनिषा यांनी रुग्णालयात दाखल असताना जबाब दिला होता. 16 एप्रिल 2015 रोजी मनिषा आणि गणेश यांचे लग्न झाले होते. मनिषा यांचे ते दुसरे लग्न होते. पतीसह सासरची मंडळी त्रास देत असल्याच्या कारणाने तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट (Divorce) घेतला होता. गणेश याच्यासोबत लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही महिन्यांनी त्यांच्यात वाद सुरु झाले. पोल्ट्री फार्मवर (Poultry Farm) काम मिळाल्याने पती-पत्नी पुरंदर परिसरातील भिवरी येथे राहण्यास आले. त्याठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. याच वादातून झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. (Pune Crime)

या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. सुनील हांडे (Government Advocate Adv. Sunil Hande) यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले.
संपूर्ण प्रकरण मृत्यूपूर्व जबाबावर आधारित होते.
आरोपी पतीने आपल्यावर खोटा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केल्याचा बचाव केला होता.
तत्कालीन सहायक फौजदार नवनाथ सस्ते (Navnath Saste) यांनी तपास केला.
सहायक फौजदार शशिकांत वाघमारे (Shashikant Waghmare), विद्याधर निचीत (Vidyadhar Nichit)
आणि अर्जुन घोडे – पाटील (Arjun Ghode – Patil) यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
साक्ष तसेच मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी पती गणेश याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

 

Web Title : – Pune Crime | Life imprisonment for husband who killed sleeping wife by pouring kerosene on her body and setting her on fire

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Must Read
Related News