Pune Crime | मुळशी तालुक्यातील तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून पुण्यात (Pune Crime) तरुणाचा सुऱ्याने भोसकून खून (Murder) करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल (Additional Sessions Judge G.P. Agarwal) यांनी आरोपी जन्मठेपेची शिक्षा सुनावताना 5 हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा (Pune Crime) सुनावली. एकनाथ तुकाराम सुतार Eknath Tukaram Sutar (वय-26 रा. निकटे वस्ती, पिरंगुट, ता. मुळशी जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील 21 वर्षीय निलेश चंद्रकांत कांबळे (Nilesh Chandrakant Kamble) याचा 14 डिसेंबर 2014 मध्ये तथागत चौकात भरदुपारी खून करण्यात आला होता. याप्रकरणी अमोल मानकर यांनी पौड पोलीस ठाण्यात (Paud police station) फिर्याद दिली होती. या खटल्यात सरकारी वकील सुनील मोरे (Public Prosecutor Sunil More) यांनी काम पाहिले. (Pune Crime)

दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी आणि मयत हे पिरंगुट येथील आठवडे बाजारात भांडी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. निलेश कांबळे याची व आरोपी एकनाथ सुतार याची घटनेच्या एक दिवस आधी बाचाबाची झाली होती. त्यावेळी सुतार याने निलेशला बघून घेईल अशी धमकी दिली होती. घटनेच्या दिवशी फिर्यादी आणि मयत यांनी आठवडे बाजारात दुकान लावले होते. दुपारी पावणे चारच्या सुमारास सुतार हा निलेश जवळ गेला. त्याने त्याच्या जवळील सुरा निलेशच्या छातीत खुपसला तसेच त्याच्या मानेवर आणि खांद्यावर वार करुन गंभीर जखमी केले.

 

या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
यानंतर आरोपी सुतार याच्यावर पौड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनिल मोरे यांनी सात साक्षीदार तपासले.
तसेच आरोपीच्या कपड्यावर मिळून आलेले निलेशच्या रक्ताचे डाग, सुऱ्यावरील रक्ताचे डाग,
दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि पंचाची साक्ष महत्त्वाची ठरली.

 

Web Title :- Pune Crime | life imprisonment to accused in murder case of mulshi of pune district court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये

Mumbai Crime | खळबळजनक ! गुंगीचं औषध देऊन पत्नीवर सामूहिक बलात्कार, पतीसह मित्राला अटक