Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून शिंदवणे, लोणीकाळभोर आणि उरळी कांचन परिसरातील दारू अड्डे उध्वस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हवेली तालुक्यातील शिंदवणे, लोणीकाळभोर आणि उरळी कांचन परिसरातील तीन गावठी दारू अड्ड्यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या (Maharashtra State Excise Department) पथकाने छापेमारी करीत हे अड्डे उदध्वस्त केले. या कारवाईत सुमारे साडेसात लाख रूपयांचा माल व दोन चारचाकी सह दोघांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना मिळालेल्या माहितीनुसार हवेली तालुक्यात गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याचे खब-यामार्फत समजले.
भरारी पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने लोणीकाळभोर, शिंदवणे व उरळी कांचन येथील अड्ड्यांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली (Pune Crime).
पथकाने केलेल्या कारवाईनुसार पाडण्यात येणारी हातभट्टीचे बॅरल जप्त करून त्याची तिथेच विल्हेवाट लावत नष्ट करण्यात आली.
या कारवाईत 14 हजार 300 लिटर रसायन व 2 हजार 50 लिटर गावठी मद्यसाठा असा एकूण साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
या कारवाईमध्ये शिंदवणे येथील गावठी दारू भट्टी मालक असणाऱ्या दोघांना अटक करून शिवाजीनगर न्यायालयत हजर करण्यात आले.

 

Web Title :- Pune Crime | Liquor dens in Shindwane, Lonikalbhor and Urli Kanchan areas were destroyed by flying squad of State Excise Department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Advt.

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | काय झाडं, काय हवा… एखाद्या वेळी ठीक; पण…, शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान!

 

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना धक्का, बारामतीमधील प्रस्तावित प्रकल्प रद्द

 

Narayan Rane On Sharad Pawar | गप्प बसा, राज्य सांभाळायला आम्ही…, शरद पवार यांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर!