Pune Crime | एसटी प्रवासात कुरिअर बॉयचे 24 लाख लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खाजगी कुरिअर कंपनीचे (Private Courier Company) पार्सल घेउन एसटीने प्रवास करणाऱ्या तरूणाला मुलींची छेड काढतोस असा आरोप करीत 24 लाखांची रोकड चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) बेड्या घातल्या आहेत. ही घटना ६ ऑक्टोबरला यवत पोलिस ठाण्याच्या (Yawat Police Station) हद्दीत (Pune Crime) घडली होती.
ओंकार दिनकर जाधव (वय-२४, रा. अकोळनेर, नगर), अनिकेत गोरख उकांडे (२३, रा. अकोळनेर, नगर), किरण रामदास गदादे (२३, रा. तांदळी, ता. शिरुर), तेजस मोहन दुर्गे (२०, रा. बारामती) आणि गणेश बाळासो कोळेकर (२०, रा. सांगवी, ता. बारामती) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेला आहे. (Pune Crime)
तक्रारदार खासगी कंपनीचे कुरिअर घेऊन सहा ऑक्टोबरला एसटीने प्रवास करत होते.
त्यावेळी त्यांच्यावर काही चोरट्यांनी पाळत ठेवत सहप्रवासी म्हणून प्रवासाला सुरूवात केली.
एसटी यवत परिसरात येताच चोरट्यांनी कुरिअर बॉयला तु मुलींना का छेडतो असे ओरडून त्याला मारहाण केली.
त्याच्या ताब्यातील कुरिअर बॅग घेऊन 24 लाखांची रोकड चोरून नेली.
गुन्हयाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तैनात केले होते.
पथकाने 15 दिवसांत आरोपींचा माग काढून टोळीला गजाआड केले आहे. आरोपींचा एक साथीदार पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. आरोपींना यवत पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite), उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस
(Sub Divisional Police Officer Rahul Dhas), स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके
(LCB Senior Police Inspector Ashok Shelke) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी ननवरे, सचिन घाडगे,
विजय कांचन, अजित भुजबळ, अजय घुले, राजू मोमीन, दत्तात्रय तांबे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव,
दगडू विरकर यांनी केली.
Web Title :- Pune Crime | Local crime branch arrested the gang who robbed 24 lakhs of courier boy in ST travel
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update