Pune Crime | तृतीयपंथ्याच्या खून प्रकरणातील आरोपी ‘काजल उर्फ केशव’ला 8 तासात गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड तालुक्यात बोरीभडक (boribhadak) येथे एका तृतीयपंथीयाचा खून (Murder) झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुणे-सोलापूर महामार्गालगत (Pune-Solapur Highway) असलेल्या गायरानात रविवारी (दि.21) सकाळी साडे नऊच्या सुमारास तृतीयपंथीयांचा मृतदेह (Pune Crime) आढळून आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आणि यवत पोलिसांनी आठ तसात अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

मगरध्वज मारुती बंडेवाड उर्फ बंटी (वय-26 रा. कोळवाडी ता. अहमदपूर जि. लातूर सध्या रा. थेऊर, ता. हवेली) असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. तर काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण (वय-26 रा. रुई धानोरा, ता. गेवराई जि. बीड सध्या रा. थेऊर) असे अटक (Pune Crime) करण्यात आलेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. याप्रकरणी मयत बंटीचा मोठा भाऊ पांडुरंग मारुती बंडेवाड (वय-28 रा. टिळेकर नगर, कात्रज) याने यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) फिर्याद दिली आहे.

 

यवत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पोलिसांनी संयुक्त तपास केला.
पोलिसांनी थेऊर फाटा (Theur Fata) ते सहजपुर फाटा (Sahajpur Fata) या दरम्यान असेलले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले.
यावेळी मयत बंटी याच्यासोबत आणखी एकजण असल्याचे दिसून आले. पोलिसांना मयत बंडी सोबत असलेली व्यक्ती काजल चव्हाण असल्याची माहिती मिळताच काजलाचा शोध घेतला.
काजलला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite), उपविभागाय पोलीस अधिकारी राहुल धस
(Sub-Divisional Police Officer Rahul Dhas) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke), पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar), सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे (API Keshav Wable), स्वप्नील लोखंडे, सचिन काळे, संदीप येळे,पोलीस हवालदार सचिन घाडगे,निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, गणेश करचे, राजीव शिंदे, संदीप देवकर, महेंद्र चांदणे,रामदास जगताप, मेघराज जगताप, निखिल रणदिव, सोमनाथ सुपेकर,मारुती बाराते, किरण तुपे यांनी केली आहे.

 

Web Title : Pune Crime | local crime branch of Pune rural police arrest one in transgender murder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Actor Ravi Dubey | अभिनेता रवी दुबेच्या चेहऱ्याला झाली गंभीर जखम, फोटो पाहून अंगावर येईल काटा

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या बोल्ड लूकनं वाढवला सोशलचा भलताच ‘पारा’ ! एकानं कमेंट्समध्ये चक्क विचारलं – ‘तुम्ही अंतरवस्त्र विसरलात का?’

Solapur Crime | धक्कादायक ! मोबाईलवरील अश्लील व्हिडीओपाहून चेकाळलेल्या पतीनं धरला वेगळाच ‘हट्ट’, पत्नीनं घेतली पोलिसांत धाव