Pune Crime | सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे भरदिवसा युवकाचा खून करणारे दोघे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) नांदेड फाटा परिसरात (Nanded Fata) 23 मार्च रोजी दिवसाढवळ्या एका युवकाचा खून (Murder In Pune) करण्यात (Pune Crime) आला. दरम्यान त्या खुनातील दोन फरार आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Arrested) आहेत. अमोल अर्जुन शेलार (Amol Arjun Shelar) (वय 19, रा. पोकळे वस्ती, धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) व अभिजित राम गंगणे (Abhijit Ram Gangane) (वय 20, रा. जनता वसाहत, गल्ली नं. 42, पर्वती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch Pune Rural Police) केली.

 

बुधवार (23 मार्च) रोजी सांयकाळच्या दरम्यान मारुती लक्ष्मण ढेबे (Maruti Laxman Dhebe) (वय 20) यांच्यावर एका कारमधून आलेल्या 6 ते 7 जणांनी कोयत्याने हल्ला केला होता. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यु (Died) झाला. घटनेनंतर हल्लेखोरांनी पळ काढला. ही सर्व घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली होती. यामुळे पोलिसांना आरोपींची नावे निष्पन्न करण्यात यश आले होते. (Pune Crime)

 

दरम्यान, खुन झालेला मारुती ढेबे हाही सराईत गुन्हेगार होता.
गतवर्षी नांदेड गावातील एका तरुणावर त्याने व त्याच्या काही साथीदारांनी तलवार व कोयत्यांनी जीवघेणा हल्ला केला होता.
त्यातून तो तरुण थोडक्यात बचावला होता.
मृत ढेबे याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) खुनाचा प्रयत्न, दहशत पसरवणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत.

दरम्यान, ढेबे खून प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी हवेली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीसांची पथके आरोपींचा शोध घेत होती. या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली.
रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) येथील पुणे.-.नगर रस्त्याला (Pune-Nagar Road) लागून असलेल्या एका लॉजमध्ये हे आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक अमोल शेडगे (Police Naik Amol Shedge) यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी 2 आरोपींना झोपेत असताना शनिवार दिनांक 26 रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली.
यानंतर त्यांना पुढील तपासासाठी हवेली पोलीस ठाण्याकडे (Haveli Police Station) सुपुर्द केले.
याप्रकरणी अधिक तपास एपीआय निरंजन रणवरे (API Niranjan Ranavare) करीत आहेत.

 

दरम्यान, सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे (PSI Amol Gore), रामेश्वर धोंडगे (Rameshwar Dhondge),
पोलीस हवालदार राजू मोमिन (Police Constable Raju Momin), अजित भुजबळ (Ajit Bhujbal), पोलीस नाईक मंगेश थिगळे (Police Naik Mangesh Thigale), अमोल शेडगे (Amol Shedge) व महिला पोलीस कॉन्स्टेबल पूनम गुंड (Poonam Gund) यांनी केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Local crime branch of pune rural police arrested two in sinhagad road
nanded fata murder case from ranjangaon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा