Pune Crime | औरंगाबादेत प्रेयसीची हत्या करून पसार झालेल्या प्रियकरास लोणावळ्यात अटक

पुणे / लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | औरंगाबाद येथे आपल्या प्रेयसीची हत्या करून (Pune Crime) पसार झालेल्या आरोपी प्रियकराला लोणावळा शहर पोलिसांनी (Lonavla city police) बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसीचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमप्रकरण चालू असल्याच्या संशयातून तिचा खून (Murder) करून औरंगाबाद (Aurangabad) येथून लोणावळा येथे आलेल्या आरोपी प्रियकर भोला कुमार (वय 27, मूळ राहणार गोरखपूर, उत्तर प्रदेश) याला लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे.

 

याबाबत माहिती अशी, भोला कुमार (Bhola Kumar) याचे मृत तरुणी इंदू बरखू राय Indu Barkhu (वय 22, रा. मुकुंद नगर, रामकाठी, औरंगाबाद) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते.
भोला हा या तरुणीच्या वडिलांच्यासोबत प्लंबिंगचे काम करीत होता. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्याच घरी राहण्यास होता.
यामुळे त्या दोघांत प्रेमसंबंध जमले. मात्र, इंदू हिच्या घरात समजल्यावर भोला कुमार याला इतरत्र बाहेर राहण्यासाठी जावं असं इंदू हिचा मोठा भाऊ सुनील (Sunil) याने सांगितले.
त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नेहमीप्रमाणे इंदू ही कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली.
पंरतु, रात्री उशिरापर्यंत घरी परत आली नाही. यामुळे तिच्या घरच्यांनी भोला याच्याशी संपर्क साधला.
भोलाही त्यांच्यासोबत इंदूचा शोध घेण्यासाठी गेला. मात्र, इंदूचा शोध लागला नाही.

 

दरम्यान, दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथील राजनगर विभागातील एका मैदानात एक तरूणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे असं इंदूच्या घरच्यांना कळाले.
त्याठिकाणी चौकशी केली असता इंदू असल्याचे लक्षात आले. त्यावेळी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, तत्पुर्वी डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर घरच्यांनी भोलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
पण त्याचा फोन बंद होता. त्यामुळे संशय आला. याबाबत इंदूच्या घरच्यांनी औरंगाबाद पोलिस ठाण्यात (Aurangabad Police Station) फिर्याद दिली.

दरम्यान, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता भोला हा लोणावळ्यात पळून गेल्याचे कळले. यावरून औरंगाबाद पोलिसांनी लोणावळा पोलिसांना (Pune Crime) कळवले.
या माहितीवरुन लोणावळा पोलिसांनी तपास सुरू केला. लोणावळ्यातील सेंटर पॉईंट याठिकाणी भोलाला अटक (Arrested) करण्यात आली.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील (DYSP Rajendra Patil), पीआय दिलीप पवार (PI Dilip Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सतीश शिंदे
(API Satish Shinde), पोलीस नाईक अजीज मिस्त्री (Aziz Mistry), पोलीस काॅन्स्टेबल हनुमंत शिंदे (Police Constable Hanumant Shinde),
स्वप्निल पाटील (Swapnil Patil), मनोज मोरे (Manoj More), गणेश अकोलकर (Ganesh Akolkar) यांनी केली आहे.

 

Web Title : Pune Crime | lonavla police arrest murder criminal of aurangabad pune rural police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nora Fatehi नं पुन्हा सोशलवरील वातावरण केलं ‘गरम’, ‘कुसु-कुसू’च्या दिलखेच अदांमुळं चाहत्यांच्या भुवया उंचावल्या (व्हिडिओ)

Online Life Certificate | घरबसल्या ऑनलाइन जमा करू शकता हयातीचा दाखला, बँकिंग अलायन्स देतंय सुविधा

Chandrakant Patil | ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खासगी रुग्णालयात, सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही का?’